Krunal Ghorpade sakal
मुंबई

‘मराठी वाजलेच पाहिजे’या थीमवर जुन्या मराठी गाण्याचे वेड लावणारा तरुण कोण?

सकाळ वृत्तसेवा

Who is Krunal Ghorpade Marathi Vajlach Pahije

नितीन बिनेकर

‘झुक झुक झुक आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काडी’ या मराठी बालगीताच्या आवाज पंचतारांकित हॉटेल, पब आणि मोठ्या पार्टीत घेऊन जाण्याची किमया विरारच्या कृणाल घोरपडे या तरुणाने करुन दाखवली आहे. ‘मराठी वाजलेच पाहिजे’ या थीमवर आधारित जुन्या मराठी गाण्याचे वेड त्याने तरुणाईला लावले. मात्र त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.

कृणाल घोरपडे याचे बालपण विरारमधील मराठी चाळीत गेले. त्याच्या वडिलांना हॉलीवूड ते भजनापर्यंत सर्व गाणी ऐकण्याचा छंद होता. वडिलांची आवड कृणालमध्ये उतरली. लहान असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.

कृणालला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे होते. त्याचे शिक्षण घेत असताना रिमिक्स संगीत तयार करण्याचा छंदही त्याने कायम ठेवला. इलेक्ट्रिक डान्स म्युझिकमध्ये पारंगत होण्यासाठीचे प्रशिक्षण कृणालला घ्यायचे होते; मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कृणालने त्याचा नाद सोडला.

ग्रॅमी पुरस्कार विजेते डेव्हिड गुएटा यांचा भारतात जेव्हा पहिला शो झाला, त्यावेळी आपणही डीजे व्हावे, असे कृणालला वाटू लागले. शिक्षणासोबत त्याने ‘इलेक्ट्रिक हाऊस म्युझिक’चा अभ्यास सुरू ठेवला.

निःशुल्क सॉफ्टवेअरच्या मदतीने तो रीमिक्स गाणी तयार करत होता. ती गाणी कुटुंब आणि मित्रांना ऐकवत होता. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृणालने नोकरी सुरू केली. यादरम्यान इलेट्रिकची डान्स म्युजिकची जागतिक परिषद नेदरलँडच्या अँमस्टरडम शहरात होणार होती.

कुठल्याही परिस्थितीत या परिषदेला त्याला सहभागी व्हायचे होते. त्यामुळे त्याने मुंबईतील नोकरी सोडून कमी पगारात नेदरलँडमध्ये नोकरी स्वीकारली. या परिषदेत कृणाल उपस्थित राहिला. सर्व बारकावे शिकून कृणालने ‘हाऊस म्युझिक’ला सुरुवात केली.
कोरोना संकटात कृणालची नोकरी गेली.

मात्र या काळात त्याने ‘हाऊस म्युझिक’ बनविणे आणि इंस्टाग्रामवर ते अपलोड करणे सुरू ठेवले. त्याच्या गाण्याचे कौतूक जगविख्यात डीजे क्रिस लेस याने केले. एके दिवशी कृणालने ‘मामाच्या गावाला जाऊया’ या मराठी बालगीताला ‘इलेक्ट्रिक म्युझिक’मध्ये रीक्रिएट केले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले.

या गाण्याला काही लाख व्ह्यू आले. अनेक सेलिब्रिटींनी ते गाणे शेअर केले. तसेच अनेकांनी त्यावर असंख्य रिल्स बनल्या. या गाण्याने कृणालला खऱ्या अर्थाने प्रसिध्दीच्या झोतात आणले.

पहिला शो ‘सुपरहीट’

हाऊस म्युझिकमधील कृणालचे कौशल्य बघून कोल्हापुरातल्या रॉक कच्ची (दादा) याने कृणालशी संपर्क साधला. मराठी संगीत सर्वत्र पोहोचले पाहिजे, असे मला वाटले असे रॉक कच्चीने ''सकाळ''शी बोलताना सांगितले. मात्र मी पुण्यातील अनेक क्लबशी संपर्क साधला. बहुतांश लोकांनी हे संगीत चालणार नाही, असे सांगितले.

शेवटी स्वत:चे पैसे टाकून हा शो करावा लागला. या शोमध्ये ''रेशमांच्या रेघांनी, हिल हिल पोरी हिला, विंचू चावला, अंग नाच नाच राधे, दिसला गं बाई दिसला, मामाच्या गावाला जाऊया’ या अस्सल मराठी गाण्याच्या तालावर तेथील लोकांना थिरकायला भाग पाडले. या शोनंतर कृणालने मागे वळून बघितले नाही.

अशी सुरू झाली मोहीम

राज्यातील पंचतारांकित हॉटेल, पब आणि पार्टीमध्ये मराठी गाणी वाजवली जात नाही. त्यावर कृणालने ‘मराठी वाजलेच पाहिजे’ या हॅशटॅगखाली एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट खूप व्हायरल झाली, अनेक मराठी सेलिब्रिटींनी ती पोस्ट शेयर केली. त्यानंतर ‘मराठी वाजलेच पाहिजे’ ही रॉकी आणि कृणालची संयुक्त मोहीम सुरू झाली.

माझ्या मराठी गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून जिथे कधी मराठी गाणी वाजत नव्हती त्या ठिकाणावरून मला मराठी गाणी वाजवण्यासाठी बोलावले गेले. लवकरच माझा परदेशात शो होणार आहे. आपले मराठी गाणी परदेशात वाजायची, हे लक्ष्य आहे.
- कृणाल घोरपडे, डीजे म्युझिक प्रोड्युसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT