मुंबई

रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून तिघे जखमी

CD

ठाणे, ता. ६ (वार्ताहर) : परवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकीने गोळी सुटून तिघे जण जखमी झाल्याची घटना श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वागळे इस्टेट येथे शनिवारी (ता. ६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. चामुंडा फॅब्रिकेटर्स कंपनीचे मालक मोहम्मद उमर शेख (वय ५०, रा. लोकमान्य नगर, ठाणे) यांच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. त्याची साफसफाई करताना चुकून एक गोळी रिव्हॉल्व्हरमधून बाहेर पडली. या घटनेत मोहम्मद शेख यांच्यासह त्यांच्या जवळ असलेले बिपिन कुमार जगजीवन जयस्वाल (वय २१) व राहुल कुमार शेखरपुरम जयस्वाल (वय २३) हे तिघे जखमी झाले. जखमी बिपिन आणि राहुल यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. परिमंडळ-५ चे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलिस आयुक्त गजानन काब्दुले तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्रीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT