Mumbai Pollution sakal
मुंबई

Pollution: नवी मुंबईच्या हावेचा दर्जा खालावला; नागरीकांना होत श्वसनाचा त्रास

सकाळ डिजिटल टीम

नव वर्षाच्या आरंभीही नवी मुंबईतील हवेचा दर्जा खालावला होता. वाशी, तुर्भे, जुईनगर, सानपाडा या परिसरातील हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीपर्यंत गेली होती. त्याचा परिणाम आता स्थानिकांच्या आरोग्यावर होत असून अनेकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रारी पुढे येत असल्याने वाढणारे प्रदूषण डोकेदुखी ठरत आहे.

पावसाळ्यानंतर नवी मुंबईतील हवेच्या गुणवत्ता पातळीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. १ ते ७ जानेवारी या कालावधीत शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १८० ते ३०० च्या आसपास राहिलेले आहे. सततच्या खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तमुळे त्याचा परिणाम आता शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना खोकला, डोळ्यांची आग, श्वसनाला त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रदूषित हवेमुळे गंभीर आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींसह शहरात वाढत असलेल्या गाड्यांमुळे होणारे प्रदूषण तसेच शहरातील बेकायदा बांधकामांमुळे हवेत उडणाऱ्या धुलिकणांमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे.


औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या प्रक्रियेविना बाहेर सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे रात्रीच्या वेळी तसेच पहाटे वाशी परिसरात धुरक्याची चादर पसरलेली असते. तसेच विशिष्ट प्रकारचा घाण वास येत असल्याने श्वास घ्यायलाही त्रास होत आहे.
-विनिल सिंग, रहिवासी


वाशी आणि तुर्भे परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्याप्रमाणात धुरके पसरलेले असते. रस्त्यावरच्या गाड्याही स्पष्ट दिसत नाहीत. हवेतून घाण वास येत असल्याने माझ्यासह आईला देखील खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे घरातही मास्क लावूनच वावरण्याची वेळ आली आहे.
- प्रशांत थोरात, रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: कोल्हापुरातील नाराजी नाट्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर! कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी फायनल झालेले उमेदवार; जाणून घ्या संपूर्ण यादी

Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Assembly Elections: बंडखोर इतिहास गिरवणार! महाराष्ट्रात यंदा विधानसभा १९९५ची पुनरावृत्ती होणार?

Raj Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार, बोचरी टीका करत राज ठाकरेंनी भूतकाळ गिरवला!

SCROLL FOR NEXT