small baby  sakal
मुंबई

Mumbai News: बाळांमध्ये बळावतेय स्पायना बिफिडाची समस्या

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

भाग्यश्री भुवड


मुंबई, ता. १३ : गर्भधारणेपूर्वी महिलेच्या शरीरात असलेली फॉलिक ॲसिडची कमतरता बाळाच्या सर्वांगिण विकासावर दुष्परिणाम करणारी ठरू शकते. सध्या भारतातील मुलांमध्ये स्पायना बिफिडाची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. स्पायना बिफिडा हा सर्वसामान्य आजार असला, तरी याबाबत महिला आणि समाजात जागरुकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक हजारपैकी चार ते पाच मुलांमध्ये हा विकार आढळतो.


स्पायना बिफिडा या आजारात पाठीचा मणका आणि मेरुदंड व्यवस्थित विकसित होत नाही. त्यामुळे मुलांच्या विकासात अडचणी येतात. अनेकदा मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने याचे वेळीच निदान व उपचार होत नाहीत.

त्यामुळे भविष्यातील गुंतागुंत वाढते. स्पायना बिफिडाच्या वाढत्या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता लीलावती रुग्णालयाच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाने स्पायना बिफिडा फाऊंडेशनच्या सहकार्याने गेल्या वर्षभरात जवळपास २० शस्त्रक्रिया मोफत आणि रुग्णांच्या नातेवाईकांना परवडणाऱ्या दरात केल्या आहेत. शिवाय ३० जानेवारीला रुग्णालयात याचसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आजारामुळे होणारे तोटे
स्पायना बिफिडा हा जन्मजात आजार आहे; पण या आजाराबाबतच्या अज्ञानामुळे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना वेळेत उपचार मिळत नाहीत. हा अनुवांशिक आजार नसून गर्भधारणेच्या सुरुवातीला आईमध्ये फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये ही समस्या उद्‍भवते. यामुळे बाळाला कायमचे अपंगत्व, विकृती, दैनंदिन कामासाठी इतरांवर अवलंबून राहणे, लघवी आणि शौचावर नियंत्रण न राहणे यातून जीवनाची गुणवत्ता कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

....................
काय आहेत लक्षणे?
स्पिना बिफिडा हा आजार पाठीच्या कण्याला प्रभावित करतो. जन्माच्या वेळी या स्थितीचे निदान होते. हा एक प्रकारचा न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहे. गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतर स्पिना बिफिडाचे निदान केले जाऊ शकते. अशक्तपणा, पायाचा अर्धांगवायू, आकडी येणे, पायांमधील विकृती, असमान नितंब आणि मूत्राशयाच्या समस्या ही स्पिना बिफिडाची लक्षणे आहेत.

आजाराचे दोन प्रकार
१) मायलोमेनिंगोसेल हा स्पायना बिफिडाचा सर्वात गंभीर प्रकार आहे. यात मुलाच्या पाठीच्या मणक्यावरील छिद्राच्या बाहेर एक पिशवी समाविष्ट आहे. या थैलीमध्ये पाठीचा कणा आणि मज्जातंतूंचे काही भाग असतात. थैलीतील पाठीचा कणा आणि नसा खराब होतात. स्पायना बिफिडाच्या या प्रकारामुळे मध्यम ते गंभीर अपंगत्व येते.


२) स्पाइना बिफिडा ऑकल्टा हा स्पायना बिफिडाचा सर्वात सौम्य प्रकार आहे. सहसा मुलाच्या पाठीला छिद्र नसते, फक्त मणक्यात एक अंतर असते. या प्रकारात पाठीचा कणा किंवा मज्जातंतूंना कोणतेही नुकसान होत नाही. पुष्कळ वेळा, स्पायना बिफिडा ऑकल्टाचे निदान लहानपणी किंवा प्रौढावस्थेपर्यंत होत नाही. स्पायना बिफिडा या प्रकारामुळे सहसा कोणतेही अपंगत्व येत नाही.

स्पायना बिफिडा आजारामुळे बालपणातच पक्षाघात (पोलिओपेक्षा गंभीर) होतो. भारतात दरवर्षी हजार बालकांपैकी स्पायना बिफिडाची चार ते पाच प्रकरणे आढळतात. फॉलीक ॲसिड सप्लिमेंट्स घेण्याबाबत जनजागृतीचा अभाव हा या स्थितीला कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक आहे. बहुतेकदा, महिलांना त्यांच्या गर्भधारणेबद्दल माहिती नसते आणि म्हणूनच पुरेशा प्रमाणात फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स घेतले जात नाही. अनेक गर्भधारणा अनियोजित असतात, ज्यामुळे स्त्रिया अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि फॉलिक ॲसिडपूरक आहार घेणे टाळतात. अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि फॉलिक ॲसिडपूरक आहाराच्या सेवनाने स्पायना बिफिडा ८० टक्क्यांपर्यंत टाळता येतो.
- डॉ. संतोष करमरकर, बालरोग सर्जन


स्पायना बिफिडासाठी योग्य उपचार व वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी लीलावती रुग्णालय हे एकमेव केंद्र आहे. रुग्णालय आणि त्याच्या बालरोग शस्त्रक्रिया विभागाने आतापर्यंत शेकडो स्पायना बिफिडा रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
- लेफ्ट. जन. डॉ. व्ही. रविशंकर, हृदयरोग शल्यचिकित्सक, लीलावती रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT