Navi Mumbai News: उरण पूर्व विभागातील नागरिकांसाठी खोपटे खाडी पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, कंटनेरमुळे या पुलावर कोंडीची समस्या उद्भवत असल्याने उरण पूर्व विभागातील नागरिकांना दीड दीड तास एकाच ठिकाणी अडकून राहावे लागत आहे. उरण परिसरातील जासई, भेंडखळ,करळ, गव्हाण, सोनेरी, जसखार, नवघर, धुतूम, चिर्ले तसेच खोपटा, कोप्रोली मार्गावर मोठ्या प्रमाणात कंटेनरची वाहतूक होते.
जेएनपीटी बंदरातील मालाच्या साठवणुकीसाठी या विभागात मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत. पंधरा वर्षांपूर्वी हे कंटेनर यार्ड जासई गव्हाण, करळ, सोनारी, नवघर, भेंडखळ, बोकडविरा या परिसरातच होते. आता जेएनपीटी बंदरात वाढलेली वाहतूक पाहता कंटेनर यार्ड कमी पडू लागल्याने उरण पूर्व विभागातील खोपटा, कोप्रोली, सारडे, पिरकोन या भागात हे यार्ड उभारले गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
त्याचप्रमाणे विंधणे, भोम टाकी, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, कळंबूसरे, चिरनेर या विभागातही कंटेनर यार्डची वाढत्या संख्येमुळे माल उतरवण्यासाठी लागणारा वेळ पाहता उरणकरांना रस्त्यांवर तासंनतास उभे रहावे लागते.
वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था
उरण परिसरात दिवसाला शेकडो कंटेनर रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे अर्धा रस्ता कंटेनरमुळे व्यापून जात आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अशातच या चालकांवर कारवाईच होत नसल्याने चालकांकडून रहिवाशांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे कंटेनर चालकांना रस्ते आंदण दिल्यासारखे दिसत आहे. तसेच कंटेनरच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे.
उरण परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अनेकदा प्रशासनाशी पत्रव्यवहार केले आहेत. अतिमहत्त्वाची व्यक्ती आल्यावरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले कंटेनरवर अंकुश आणला जातो. मात्र, उरण परिसरातील नागरिकांच्या जिवाचे मोल नाही.
- वैजनाथ ठाकूर, माजी सदस्य, रायगड जिल्हा परिषद
दोन्ही बाजूने उभ्या असलेल्या कंटेनरमुळे अर्धा रस्ता अडवला जातो. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत आजारी व्यक्ती, नोकरदार, विद्यार्थी यांना नाहक त्रास होतो. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- विशाल म्हात्रे, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.