Lokshabha Election: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एप्रिल, मेमध्ये निवडणुका होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दोन-तीन दशकांतील राजकीय परिस्थितीचा विचार करता १९९० च्या दशकात ठाण्यात काँग्रेसचे लक्षणीय अस्तित्व आणि एकनिष्ठ मतदारांचा आधार होता. मात्र, गेल्या काही वर्षांत ठाणे लोकसभेची जागा सातत्याने काँग्रेस मित्र पक्षांना देत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे.
त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्ण अल्वरू, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या समोर केली आहे.
जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लोकचळवळ
गेल्या १२ वर्षांपासून संघटनेमध्ये काँग्रेससाठी निष्ठेने काम करत असून, पक्षाने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या आतापर्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. ‘काही तरी कर नवी मुंबईकर’ या लोकचळवळीच्या माध्यमातून नवी मुंबईतील सामान्य जनतेची मोठी ताकद उभी केली असून, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पसरू शकते, असा विश्वास अनिकेत म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.