मुंबई

Hapus News: बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका; मार्चनंतरच बाजारात होणार दाखल

CD

Hapus News: डिसेंबरमध्ये देवगड हापूसची मुंबईच्‍या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होते. यातून शेतकरी आणि व्‍यापाऱ्यांना चांगली कमाई होते; मात्र यंदा हवामानाचा फटका हापूसला बसला आहे. त्‍यामुळे डिसेंबरमध्ये काही प्रमाणात हापूस दाखल झाला होता. मात्र आता पूर्णपणे आवक थंडावली आहे. मार्चनंतरच हा हापूस बाजारात दाखल होईल, असे सांगण्यात येत आहे.

डिसेंबरमध्ये वाशीच्‍या एपीएमसी मार्केटमध्ये व्‍यापाऱ्यांपासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांना वेध लागतात ते हापूसच्‍या आंब्याचे. या दरम्‍यान बाजारामध्ये देवगडचा हापूस दाखल होतो; मात्र तो अत्‍यंत महाग असा विकला जात असल्‍याने त्‍यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. या दरम्‍यान पाच डझनांची पेटी दहा हजार रुपयांपासून ते वीस हजार रुपयादरम्‍यान विकली जाते. त्यामुळे हापूसच्‍या हंगामाकडे सर्वांचे लक्ष असते. त्यानुसार डिसेंबरच्‍या सुरुवातीला बाजारात हापूस आंबा येण्यास सुरुवात झाली होती. मात्र यंदा दोन वेळा आलेल्या पावसाने अनेकांच्या आंब्याच्‍या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये सुरू झालेली आंब्याची आवक आता पूर्णपणे थंडावली आहे. जानेवारीमध्ये बाजारात हापूस आंबा पाहायलाही मिळत नसल्‍याचे व्‍यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.


डिसेंबरमध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या एक-दोन पेट्या आल्‍या होत्या. शिवाय त्याच दरम्यान मलावी देशातील आंबेही पंधरा दिवस बाजारात उपलब्ध होते. त्यामुळे बाजारात आंबे पाहायला मिळत होते. मात्र या वेळीदेखील आलेल्‍या अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जो काही आंबा येणे अपेक्षित होता, तो आता बाजारात येणे शक्य नसल्‍याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात आंबा पाहायला मिळत नसल्‍याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान केले आहे. शिवाय, मध्येच पडणारी आणि गायब होणाऱ्या थंडीमुळे आंब्याला मोहोर आलेला नसून काही ठिकाणी तो गळून गेला आहे. त्यामुळे नवीन मोहोर येऊन फळ धारण होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे यंदा बाजारात आंबा येण्यास उशीर लागणार असल्‍याचे व्‍यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.Hapus

यंदा खर्चात वाढ
बदलत्‍या हवामानामुळे यंदा आंब्याच्‍या देखभालीचा खर्च वाढला आहे. या हवामानामुळे आता औषध फवारणी नियमित करावी लागत आहे. कधी कधी दिवसातून दोन वेळा फवारणी करावी लागत असल्‍याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्‍यातच औषधांचा खर्च वाढला आहे. त्‍यामुळे यंदा हापूसच्‍या दरात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

बदलत्या लहरी हवामानाचा फटका बसल्याने आंब्याच्‍या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या बाजारात हापूस आंबा नाहीसा झाला आहे. त्‍यामुळे प्रत्यक्षात बाजारात आंबा दाखल होण्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मार्चनंतर बाजारात कोकणातील हापूस आंबा येण्यास सुरुवात होणार आहे.
- शिवाजीराव चव्हाण, घाऊक व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT