Thane Crime: पालघरवरून मुंबईकडे चरसविक्रीसाठी जाणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ५ ने माजिवडा जंक्शनजवळ सापळा लावून आज अटक केली. अभय परशुराम पागधरे (वय ४३, रा. डहाणू) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८० लाख ८२ हजार रुपये किमतीचे आठ किलो ८२ ग्राम चरस जप्त केला आहे. कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून स्टारबक्सच्या पॅकिंगमधून तो ही तस्करी करत होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस पथकाने आरोपी अभय याला माजिवडा जंक्शनजवळ थांबवून त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडून ८० लाख ८२ हजार रुपयांचे चरस हस्तगत करण्यात आले आहे. यासोबतच ६१ हजार ३४० रुपयांचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. पोलिस पथकाने अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. आता पोलिस चरसचा साठा कोठून आणला, मुंबईत कुणाला देण्यासाठी तो निघाला होता, याबाबत चौकशी करीत आहेत. या प्रकरणात अन्य आरोपींची नावे पुढे आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी दिली.
---
पॅकिंगवर ‘अफगाण’ हे नाव
पोलिस पथकाने अटक केलेला आरोपी अभय पागधरे हा स्टारबक्सच्या पॅकिंगमधून ही तस्करी करत होता. या पॅकिंगवर अफगाण असे लिहिलेले आहे. हे पॅकिंग आरोपीने स्वतः बनविले की कंपनीकडून घेतले, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.