मुंबई

Mahrashtra Politics: मनसे-सदावर्ते यांच्यामध्ये जुंपली; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

CD

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सरकारने सुरक्षा व्यवस्था दिली आहे. त्यासाठी महिन्याला ३० ते ४० लाख रुपये खर्च केले जात आहेत. एवढा खर्च करायला ते काय सरकारचे जावई आहेत का, असा सवाल विचारणाऱ्या मनसेला गुणरत्न सदावर्ते यांनी टोल नाक्यांवर कॅमेरा लावायला ते काय सरकारी जावई आहेत का, असा सवाल करून पलटवार केला आहे.

मनसेचे पदाधिकारी मिलिंद पांचाळ आणि यशवंत किल्लेदार यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. सरकारने काहीही कारण नसताना सदावर्ते यांना सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. यावर महिन्याला ३०-४० लाख रुपये खर्च केले जात आहेत. एवढ्या पैशांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल करत ते काय सरकारचे जावई आहेत का, असा सवाल त्यांनी करून सदावर्ते यांना डिवचले.

यावर सदावर्ते यांनी ही पलटवार करत टोलनाक्यांवर कॅमेरा लावणारे राज ठाकरे हे काय सरकारचे जावई आहेत का? अशा शब्दांत उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचे कर्तृत्व एवढे मोठे नाही की त्यांना मी उत्तर द्यावे. त्यांना हवे असल्यास त्यांनी माझ्यासोबत समोरासमोर चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

राज ठाकरे यांचा खोचक टोला
राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले आहे. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल, लोकसभा निवडणुकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा, असे त्यांनी ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT