Bhivandi News: कामवारी नदी प्रदूषणमुक्त करून त्याचे पाणी प्रवाहित करण्याचे काम जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीत निधीदेखील मंजूर केल्याची माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत केंद्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम असलेल्या ''चला जाणूया नदीला'' या विषयाच्या बैठकीचे आयोजन पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. कामवारी नदीचे व तलावातील प्रदूषण मोजण्यासाठी मल्टी पॅरामीटर बसवणे, नदी प्रदूषणमुक्त व मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आयुक्त अजय वैद्य यांनी म्हटले. या कामवारी नदीत कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लास्टिक टाकू नये, नद्या प्रदूषित करू नयेत, नदी प्रवाहित करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृतमहोत्सव अंतर्गत ''चला जाणूया नदीला'' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षस्थानी जैवविविधता व्यवस्थापन समिती तयार केली आहे.
कामवारी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार आहे. यात नदीचे डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे. कामवारी नदीत सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण व तलाव समस्यांवर विचारविनिमय करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण विभागाने त्याच्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असेदेखील पालिका आयुक्त अजय वैद्य म्हणाले. याप्रसंगी जलनायिका डॉ. स्नेहल दोंदे यांनीदेखील कामवारी नदी व तलावांच्या प्रदूषणाबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पालिका प्रशासनाला व अन्य प्राधिकरणाला केल्या आहेत.
बैठकीला पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, जलनायिका डॉ. स्नेहल दोंदे, ठाणे मायनर इरिगेशनच्या क्षीरसागर, वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा रफटाटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कल्याण विभागाच्या दीपाली चौधरी, वनविभाग भिवंडीचे पी. व्ही. घुलेकर, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संदीप पटनावर व अन्य पालिका अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.