dead body  sakal
मुंबई

Bhivandi News: पाण्याच्या टाकीत आढळला मुलाचा मृतदेह!

सकाळ वृत्तसेवा

Bhivandi News: भिवंडी शहरातील कुंभारवाडा मोहल्ल्यातील महापालिका कर्मचारी कॉलनीतील २ दिवसांपासून हरवलेल्या ४ वर्षीय मुलाचा मृतदेह राहत्या इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांनी सांगितले की, मृत विध्यांश गोपाल चव्हाण हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता.

शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता खेळण्यासाठी बाहेर गेला होता; परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. यादरम्यान कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. या प्रकरणी विध्यांशच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याप्रमाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता.

दरम्यान रविवारी दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला. याप्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे. पाण्याच्या टाकीचे झाकण अर्धे उघडे असल्याने विध्यांश पाण्याच्या टाकीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT