मुंबई

Panvel News: रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची हिम्मत काेणी दाखवेल का?

त्यामुळे सध्या पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावून रिक्षांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात होणारी गर्दी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

CD

पनवेल रेल्वे स्थानकात आठवड्याभरापूर्वी दोन गटात झालेल्या वादावादीमुळे रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या आवारात असलेला रिक्षा थांबा परिसरा बाहेर हलवला आहे. यामुळे रेल्वे स्थानकातील रिक्षाचालकांचे बेशिस्त वर्तनाला चाप लागल्याचे बोलले जात होते. पण स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पण अडथळा निर्माण केला जात असून परिवहनच्या बस सेवेला त्याचा फटका बसत असल्याने रिक्षाचालकांच्या बेलगाम मुजोरीविरोधात कारवाईची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

पनवेल रेल्वे स्थानकाच्या आवारात तिकीट खिडकीसमोर रिक्षा चालकांनी ठाण मांडले होते. अशातच स्थानक परिसरात दोन गटांत झालेल्या वादामुळे रेल्वे प्रशासन तसेच पनवेल लोहमार्ग पोलिसांनी कठोर भूमिका घेत स्थानक परिसरात रिक्षा उभी करण्यास मज्जाव केला आहे.

त्यामुळे सध्या पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावून रिक्षांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात होणारी गर्दी टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मात्र, स्थानकाच्या आत होणारा त्रास आता स्थानकाच्या प्रवेशद्वारावर होवू लागला आहे. रिक्षाचालकांना स्थानकाबाहेर काढल्याने मुख्य प्रवेशद्वारातून रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी सामान घेऊन जाताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

तर स्थानकांच्या बाहेरून प्रवाशांसाठी असलेल्या एनएमएमटी तसेच केडीएमटीच्या बस सेवेला त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर उभ्या असणाऱ्या रिक्षांमधून बाहेर पडण्याची मोठी कसरत बस चालकांना करावी लागत आहे. तसेच या कोंडीचा परिणाम परिवहनच्या फेऱ्यांवरही होत असल्याने प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला तीन आसनी रिक्षाचालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. रेल्वेस्थानकात ६० फूटी रस्ता ये-जा करण्यासाठी आहे. मात्र, सामान्य प्रवाशांना चालण्यासाठी अवघा सहा फूट रुंदीचा रस्ता शिल्लक ठेवला होता.

त्यामुळे पदपथावरून एकमेकांना धक्के मारुन प्रवाशांना चालावे लागत होते. तसेच उरलेल्या निम्या रस्त्यामध्ये एकरी मार्ग असताना त्यावरूनही दुहेरी प्रवास रिक्षाचालक करत असून हा सर्व प्रकार रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत होत आहे.

- बेकायदा रिक्षा थांबे आणि नो एन्ट्रीच्या रस्त्यावरुन वाहतूक सूरू असल्याने सामान्यांना चालण्यासाठी रस्त्यावर जागा उरली नाही. एक्स्प्रेस गाड्या पकडणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.

पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची या स्थानक परिसरात सातत्याने कार्यवाही झाल्यास हा प्रश्न निकाली निघू शकते. तसेच मीटरप्रमाणे भाडे आकारत नसलेल्या रिक्षाचालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पनवेल आरटीओकडून दुर्लक्ष
बेशिस्त रिक्षाचालकांना कारवाई धाक असतो. वाहतुकीच्या नियम तोडल्याचे मोठे दंड आहेत. रिक्षाच्या आठ दिवसाच्या व्यवसायांपेक्षा हा दंड जास्त असल्यामुळे पनवेल स्थानकातील रिक्षा चालकांना आरटीओ शिस्त लावू शकते.

त्याचबरोबर वाहतूक पोलिसही यावर कारवाई करून येथील वाहतूक सुरळीत करू शकतात. परंतु, इच्छाशक्तीचा अभाव असल्याने वारंवार अर्ज विनंत्या करूनही या दोन खात्याच्या उदासीनतेमुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली आहे.

काही दिवसांपूर्वी पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा थांबा हा बाहेर काढला आहे. त्यामुळे मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची व आरटीओची आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वारंवार या दोन खात्याशी पत्रव्यवहार केला आहे.
- जगदीश प्रसाद मीना, स्टेशन प्रबंधक, पनवेल

पनवेल स्थानकात सामान घेऊन प्रवेश करणे म्हणजे दिव्य आहे. रिक्षाचालकांनी स्थानकाची वाट अडवली आहे. काही बोलायला गेले तर ते लगेच अरेरावीची भाषा करतात. त्यामुळे आरटीओने कारवाई करणे गरजेचे आहे.
- चिन्नाप्पा बस्तेवाड, रेल्वे प्रवासी

कामावर वेळेत पोचायचे असेल तर पनवेल रेल्वेस्थानकात जाण्यासाठी घरातून लवकर निघावे लागते. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वारच जाम असल्याने सकाळच्या वेळी खोळंबा होतो. रिक्षाच्या विळख्यातून स्थानक कधी मोकळे होईल, हा खरा प्रश्न आहे.
- जीवन भोईर, प्रवासी

पनवेल रेल्वेस्थानकात रिक्षा चालकांच्या मुजोरीच्या वारंवार तक्रारी येत आहेत. पनवेल वाहतूक शाखेकडून रिक्षाचालकांवर वारंवार कारवाई केली जाते. या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT