Fishing News sakal
मुंबई

Fishing News: रोज समुद्रात जाऊनही जाळ्यात येत नाहीत मासे; हे आहे महत्वाचे कारण

Arebiean Sea Fishing: समुद्रातील वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे माशांच्या विविध प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Turbhe: गेल्या महिन्यापासून वातावरणातील गारठा वाढल्याने माशांनी उष्णतेसाठी समुद्राचा तळ गाठला आहे. त्यामुळे वातावरणातील या बदलांचा खाडीकिनारी मिळणाऱ्या मासळीला फटका बसला असून आवक घटल्याने दरातही वाढ झाली आहे.


नवी मुंबईतील बहुतांश मच्छीमार मुंबईतील भाऊचा धक्का व कुलाबा येथून ताजी मासळी खरेदी करतात. मात्र, त्या मासळीची आवक कमी झाल्याने त्यांनादेखील भाववाढीचा फटका बसला आहे. एकीकडे गारठा वाढला, तर दुसरीकडे वाढत्या प्रदूषणाचा फटका मासळीच्या प्रजननावर होत आहे. त्यामुळे मासळी मिळत नसल्याने त्यांचे दरही वाढले आहेत. सध्या दिवाळे खाडीपासून ऐरोलीपर्यंत मासेमारी केली जाते.

निवटी, बोईस, कोलंबी तसेच चिवणी यांसारखे मासे मिळतात. मात्र, गारठा वाढल्याने आवक खूपच कमी झाल्याने दिवसभराची मेहनत वाया जात आहे. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.


माशांच्या विविध प्रजाती नामशेष
समुद्रातील वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे माशांच्या विविध प्रजाती नामशेष झाल्या आहेत. पापलेट, सुरमई, घोळ आणि इतर अनेक प्रजातींचे मासे मिळेनासे झाले आहेत. मांदेली आणि बोंबील, बांगडे हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे, तसेच परवडणारे मासेही महाग झाले आहेत. परिणामी मासळीच्या दरांत वाढ झाली आहे.

मांदेली, बोंबील हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे मासेसुद्धा महाग झाले आहेत. वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. परिणामी, मासळीची आवक घटल्याने दर वाढले आहेत.
- सुरेखा कोळी, मासे-विक्रेती


माशांचे प्रकार सध्याचे दर (किलो)
सुरमई - ११००
पापलेट - १०००
काफरी पापलेट - १५००
कोळंबी - ७००
घोळ - १३००
जिताडा - १२००
हलवा - ९५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT