Mumbai Highway News: मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते मिरा-भाईंदर थेट प्रवास करता यावा, यासाठी वर्सोवा-दहिसर, दहिसर-मिरा भाईंदर उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. यासाठी तब्बल २४ हजार कोटींचा खर्च असून या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली असून २०२९ पर्यंत नागरिकांच्या सेवेत येईल, असा विश्वास पालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.
मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आल्यानंतर प्रियदर्शनी पार्क ते वरळीपर्यंत थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.
वरळी ते वांद्रे सी-लिंक प्रवासी सेवेत असून वांद्रे ते वर्सोवा उन्नत मार्गाचे काम एमएमआरडीच्या माध्यमातून होणार असून वर्सोवा दहिसर व दहिसर ते मिरा-भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. वर्सोवा ते दहिसर सहा पॅकेजमध्ये काम होणार असून दहिसर ते मिरा-भाईंदर सातव्या पॅकेजमध्ये काम होणार आहे.
मोदी यांच्या हस्ते उद्घाटने
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, तर कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन लाईनदरम्यान एक मार्गिका चार लेन १९ फेब्रुवारीपासून प्रवासी सेवेत येणार आहे. या एका मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिली. (traffic policy Vasai Virar Mira Bhayandar reducing the dilemma)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.