मुंबई

Mumbai Local News: कल्याण-बदलापूरदरम्यान रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम २०२६ पर्यंत पूर्ण होणार?

Instead of barricading in the home platform and platform number one, barricading will be done only on the 20 meter area where the work is going on.

CD

Kalyan Badlapur News: बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक बंद करण्याचा निर्णय घेतला होता; या निर्णयामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता; मात्र बदलापूरच्या लाखो रेल्वे प्रवाशांना केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलासा दिला आहे.

होम प्लॅटफॉर्म व फलाट क्रमांक एकमध्ये बॅरिकेडिंग लावण्याऐवजी केवळ काम सुरू असलेल्या २० मीटर जागेवरच बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक बंद केल्यानंतर प्रवाशांचे हाल होतील, अशा तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नवी दिल्लीहून परतल्यानंतर शनिवारी सकाळी तातडीने बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट देत प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटनांबरोबर संवाद साधला. या वेळी मध्य रेल्वे व एमआरव्हीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बदलापूर रेल्वे स्थानक विकसित करण्यात येणार असून या ठिकाणी १२ मीटरचे दोन प्रशस्त पूल, सहा एस्केलेटर आणि तीन लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार असली, तरी भविष्यातील सुविधांसाठी प्रवासी व रेल्वे यांच्यात ''सुवर्णमध्य'' काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटले.

रेल्वे स्थानकातील कामांबाबत प्रशासनाकडून पुढील १५ दिवस सुविधांबाबत चाचपणी केली जाईल. २० फेब्रुवारीनंतर प्रवासी संघटना व प्रवाशांच्या उपस्थितीत संपूर्ण कामांचे सादरीकरण केल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे कपिल पाटील यांनी सांगितले. तसेच याबाबत ठाण्यात लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. कल्याण-बदलापूरदरम्यान रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर लोकलच्या संख्येत वाढ होईल, अशी माहितीदेखील पाटील यांनी यावेळी दिली.

होम प्लॅटफॉर्मचे लवकरच उद्घाटन!
रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. खासदारकीच्या पहिल्या टर्मपासून कपिल पाटील यांनी होम प्लॅटफॉर्मसाठी पाठपुरावा केला होता. या कामातील तांत्रिक अडथळे व भूसंपादनाचा तिढा दूर करीत अखेर होम प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. लवकरच तो अधिकृतरीत्या प्रवाशांसाठी खुला होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT