एकीकडे मुंबई विमातळावरून प्रवासी संख्या वाढतच आहे. दुसरीकडे मुंबई विमानतळावरून मालवाहतुकीत प्रचंड वाढ नोंदवण्यात आली. मालवाहतुकीत गेल्या वर्षी ८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी ४ हजार ७०० मेट्रिक टन आंब्याची निर्यात मुंबई विमानतळाने केली आहे. मुंबई विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑटोमोबाईल, औषधे आणि कृषी उत्पादने; तर देशांतर्गत स्तरावर कन्सोल कार्गो, औषधे, ई-कॉमर्स आणि पोस्ट ऑफिसची (पीओ) सर्वाधिक वाहतूक झाली आहे.( 55 percent of international cargo exports and 45 percent of imports.)
मुंबई विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० आणि देशांतर्गत ६५ ठिकाणी कार्गो मालवाहतूक केली जाते. गेल्या वर्षी भारतातून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीत ५५ टक्के निर्यात आणि ४५ टक्के आयात करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन, फ्रँकफर्ट, दुबई, शिकागो आणि ॲमस्टरडॅम; तर देशांतर्गत दिल्ली, बंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद येथे सर्वाधिक मालवाहतूक केली जाते. यंदा कृषी उत्पादनांच्या वाहतुकीतही ४४ टक्यांनी वाढ झाली आहे.
तसेच आयात गेट पास प्रणालीसाठी अलीकडेच अमलात आणलेली डिजिटल डॉकेट डिलिव्हरी (डी-क्यूब) ऑनलाईन प्रक्रिया जलदगतीने होते. यामुळे कागदाचा वापर आणि मालवाहतुकीला कमी वेळ लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.