Accident News sakal
मुंबई

Accident News: नागोठण्याजवळ घडली दुर्देवी घटना; पाईपखाली दबून कामगाराचा मृत्यू

भाग दोन पाईपच्या मधे दबला गेला. जखमी कौलेश यास तत्काळ जिंदाल कंपनीच्या रुग्णालयात नेण्यात आले : Kaulesh, a laborer, was working as a loading helper in the ERW dispatch department. Koulesh climbed onto the rack to be loaded into the truck with the help of a pipe crane.

CD

नागोठण्याजवळील सुकेळी येथील ‘जिंदाल’ या पोलादी पाईपचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत पाईप उचलण्याचे काम कौलेश करत होते. त्या वेळी एक पाईप पडून त्याखाली दबून कौलेश बलदेव राय (वय ४६, रा. जिंदाल कॉलनी) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ३) घडली.

कौलेश हा कामगार ईआरडब्लू डिस्पॅच विभागात लोडिंग हेल्परचे काम करीत होता. पाईप क्रेनच्या साह्याने ट्रकमध्ये ठेवण्याकरिता कौलेश हा रॅकवर चढला होता. त्यातील एक पाईप घसरून कौलेश राय याच्या अंगावर पडला. त्याचा कमरेखालील भाग दोन पाईपच्या मधे दबला गेला. जखमी कौलेश यास तत्काळ जिंदाल कंपनीच्या रुग्णालयात नेण्यात आले;

मात्र तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. बी. चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT