उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील समझोता दृष्टिक्षेपात आल्याने आता क्रमांक दोनच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात आघाडीवर शिक्कामोर्तब करायचेच, असे काँग्रेसने ठरवले असून येथील विजयाच्या समीकरणासाठी आवश्यक असलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर सोपवली आहे.(congress wants sharad pawar to deal with prakash ambedkar)
मोदींविरोधातील सर्व पक्ष एकत्र येणे गरजेचे असून जागावाटप सामोपचाराने व्हावे, असे ‘मविआ’च्या नेत्यांना वाटते आहे. (india vs modi in maharashtra)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारसाहेबांची नुकतीच भेट घेत आंबेडकरांना राजी करण्याचे काम करा, अशी विनंती दिल्लीवरून आलेल्या निरोपानुसार केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसने ते लढून हरले अशा १४ जागा आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव ठेवल्याचे बोलले जाते, तर वंचितने आकड्यांबाबत कोणताही नवा प्रस्ताव पाठवलेला नाही.
राज्य कार्यकारिणीत १२ जागा प्रत्येकाने लढाव्यात, असा प्रस्ताव पाठवल्यानंतर आम्ही काहीही बोललेलो नाही, असे स्पष्ट केले. हे तीन पक्ष आधी जागावाटप करून मग जी जागा ज्याच्याकडे गेली त्याच्याशी चर्चा करायची, अशा समाजात ‘वंचित’ असल्याचे सांगितले जाते.
लोकसभेच्या आचारसंहितेला केवळ काही दिवस शिल्लक असताना काही ठोस व्हावे, यावर एकमत असल्याने आता त्वरेची गरज व्यक्त होते आहे. २३ रोजी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गट २० जागा, तर वंचित १४ जागांवर अडून राहिले तर जागावाटप पुढे जाणार कसे अन् उमेदवार ठरणार केव्हा, या चिंतेने काँग्रेसला पोखरले आहे. गावागावांत भाजप पोहोचले असताना मविआ किंवा इंडिया झोपलेले कसे, या अशोक चव्हाण यांच्या विचारणेला सर्वाधिक अर्थ असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये होते आहे.
या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर त्यांच्या भूमिकेनुसार मोदीविरोध करण्यासाठी आपल्याला येऊन मिळतील, असा पवारसाहेबांना विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून संवाद साधण्यात येईल, असे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. किमान समान कार्यक्रमासारख्या मुद्द्यांवर अडून बसलेल्या ‘वंचित’ला आता राजी करायला हवे, अशी ‘मविआ’तील प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. ‘मविआ’चे जागावाटप ठरवण्याआधी एकत्र सभा घेतली जाणार आहे, मात्र वंचितला किती जागा द्यायच्या, हे निश्चित झाल्यावरच जागावाटपाचा प्रश्न सुटू शकेल.(sharad pawar and congress relation)
राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरूर, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा चार ते पाच जागांवरच दावा केला आहे. भावबंधात्मकरीत्या एकत्र आलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेतही काही जागांबाबत तिढा आहे. (seats of sharad pawar ncp in maharashtra loksabha)
संजय राऊत त्यांच्या जागांबद्दलचा आग्रह अजिबात सोडत नाहीत, अशी खंत काँग्रेसमध्ये व्यक्त केली जाते आहे, तर शिवसेनेत काँग्रेस नेते चर्चा आवश्यक त्या गतीने पुढे नेत नाहीत, अशी तक्रार केली. मुंबईतील दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम या जागांबाबत काँग्रेस कमालीची आग्रही आहे.
सेनेकडे उमेदवार नसतानाही ‘गेल्या वेळी जिंकल्या’ या एकमेव आधाराने ते या जागांचा आग्रह धरतात. नाशिक, कोल्हापूर, माढा या जागांवरही सेनेकडे उमेदवार नाही, अशी काँग्रेसची भावना आहे, तर खासदार पळून गेले तरी जनता आमच्यासमवेत आहेत, असा उद्धव ठाकरे यांच्या अनुयायांना विश्वास आहे.(shivsena uddhav thackeray)
पुणे, भंडारा, वर्धा, हिंगोली या जागांवरही काँग्रेस सेनेत वेगवेगळी मते आहेत, मात्र लढण्याच्या बाण्याने उद्धव ठाकरे दौरे करत आहेत, याकडे लक्ष द्यावे, असे काँग्रेसला वाटते.
त्यांच्या या गतीची दखल घेत जागावाटप चर्चा आता अंतिम करा, असा तिन्ही पक्षांचा आग्रह आहे. २३ फेब्रुवारीला काँग्रेसच्या निवडणूक संचालन समितीची बैठक मधुसूदन मिस्त्री, रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत होणार आहे. (seats of congress in marashtra in loksabha)
या बैठकीत काँग्रेसकडे आलेल्या मतदारसंघश: अर्जांचा आढावा घेण्यात येणार आहे. काँग्रेसने या आठवड्यात जागावाटप पूर्ण करायला हवे, असे ठरवले आहे.
किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करा, या मागणीची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, जागावाटप बैठकीची कोणतीही माहिती अद्याप मिळाली नसल्याचे ‘वंचित’ने सांगितले.(vanchit bahujan aghadi in mahrashtra loksabha)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.