मुंबई

नगररचना विभागातील दोन कर्मचारी अटकेत

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : कल्याण-डोंबिवली महापालिकेत दोन कर्मचाऱ्यांना बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. नगररचना विभागातील बाळू बहिराम, राजेश बागूल अशी अटक कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बांधकाम मंजुरीसाठी आलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर असून याप्रकरणी पालिकेने तक्रार केली होती.

पालिकेतील वादग्रस्त विभाग म्हणून ओळखला जाणारा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार डोंबिवली पश्चिमेत महाराष्ट्रनगरमध्ये विनोद बिल्डर्सचे मालक विनोद म्हात्रे, रमेश म्हात्रे, वास्तुविशारद धीरज पाटील यांनी नगररचना विभागात सहा माळ्यांच्या इमारतीचा आराखडा जुलै २०२१ मध्ये मंजुरीसाठी दाखल केला होता. आराखडा दाखल करताना विनोद बिल्डर्सने भूमिअभिलेख विभागाचा बनावट मोजणी नकाशा इमारत आराखड्यासोबत सादर केला होता. या आराखड्यानुसार खासगी जमिनीलगतची गुरचरणीची सहा गुंठे जमीन खासगी मालकीची दाखविण्यात आली होती. आराखडा मंजुरीपूर्वी सर्वेअर बाळू बहिरम, आरेखक राजेश बागूल यांनी संबंधित जमिनीचा प्रत्यक्ष स्थळ सर्वे करून जमिनीचे अचूक रेखांकन करणे आवश्यक होते. मात्र विकसकाने दाखल केलेला प्रस्ताव योग्य असल्याचा शेरा देत आरोपींनी हा प्रस्ताव तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, अभियंता ज्ञानेश्वर आडके यांच्याकडे पाठविला. दरम्यान संबंधित इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर माजी नगरसेवक रमेश पद्माकर म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली. चौकशीदरम्यान भूमी अभिलेख विभागाने विनोद बिल्डर्सने पालिकेत दाखल केलेला नकाशा आम्ही दिला नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर सहायक संचालक नगररचना दिशा सावंत यांनी विनोद बिल्डर्सची बांधकाम परवानगी रद्द केली.


..
आरोपींना पोलिस कोठडी
बोगस कागदपत्रासंबंधी नगररचनाकार शशिम केदार यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात विकासक विनोद म्हात्रे, वास्तुविशारद यांच्याविरोधात तक्रार केली होती. या प्रकरणात बाळू बहिरम व राजेश बागूल दोषी आढळल्याने बाजारपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची म्हणजेच २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump 2.0: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आले! राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या टर्मचा भारतावर काय होऊ शकेल परिणाम?

लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहत होती हृता दुर्गुळे ; आई होती नाराज पण सासूबाईंची होती अशी प्रतिक्रिया

'सासूसाठी भांडण अन् सासूच आली वाट्याला..'; 'मविआ'चा लाटकरांना पाठिंबा, विरोध करणाऱ्यांवरच आली प्रचार करण्याची वेळ

Mukesh Ambani Diet: नीता अंबानींनी शेअर केला मुकेश अंबानींचा डाएट प्लॅन, निरोगी राहण्यासाठी तुम्हीही करू शकता फॉलो

Stock Market: ट्रम्प यांचा दणदणीत विजय आणि भारतीय शेअर बाजाराने दिली सलामी; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT