mumbai local crime sakal
मुंबई

Mumbai Local News: रविवारच्या मेगाब्लॉकमधून मुंबईकरांची सुटका, मात्र...!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: उपनगरीय रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी शनिवारी मध्यरात्री (ता. २३) मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर रात्री १२.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप- डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

परिणामी, ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावरून चालविण्यात येईल. तसेच रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Pune Speech: सगळं जातीचं राजकारण शरद पवारांचे, कसबा-कोथरुडमध्ये राज ठाकरे कडाडले...

Assembly Election 2024 : चिन्हाची चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार; काय म्हणाले निवडणुक निर्णय अधिकारी...

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मोदींची नाही; ठाकरेंची गॅरंटी चालते!

Ambadas Danve: किती प्रॉम्पटिंग करायचं तानाजी राव! मुख्यमंत्र्यांना काहीतरी बोलू द्या... दानवेंनी उडवली खिल्ली, Video व्हायरल

Sports Bulletin 9th November: गंभीरला गमवावे लागू शकते प्रशिक्षक पद ते यशवर्धनची मुंबईविरुद्ध ४२६ धावांची ऐतिहासिक खेळी

SCROLL FOR NEXT