Navi Mumbai: कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव एनएमएमटीची उरण बस सेवा शुक्रवार (ता. २३) पासून अनिश्चित काळावधीसाठी बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी दिली.
खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर जुईनगर रेल्वेस्थानक ते उरणच्या कोप्रोली गावादरम्यानची एनएमएमटीची ३४ क्रमांकाची बस सेवा बंद करण्यात आली होती.
अपघातानंतर कर्मचाऱ्यांनी या मार्गावर काम करण्यास नकार दिला. त्यामुळे या मार्गावर दिवसभर ५२ फेऱ्या आणि ५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते.
त्याचवेळी उरणच्या उर्वरित मार्गावरील वाहतूकही बंद करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. ३० आणि ३१ क्रमांकाच्या दोन्ही बस बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
कोपरखैरणे ते उरण ही ३१, तर कलंबोळी ते उरण या मार्गावरील ३० या दोन क्रमांकाच्या बस सुरू होत्या. या बसमधून दिवसाला ७ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करायचे. एकूण १२० फेऱ्या या मार्गावर चालवण्यात येत होत्या. या बसमुळे उरणच्या नागरिक, विद्यार्थी आणि चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्त्वाची सेवा बनली आहे.
एनएमएमटीच्या मार्ग क्रमांक ३४ जुईनगर-कोप्रोली बसचा ८ फेब्रुवारीला अपघात झाल्यानंतर जमावाने एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळीच डांबून ठेवले होते. तसेच संतप्त कर्मचाऱ्यांनी १० फेब्रुवारीला निषेध करून काही काळ सर्व बस सेवा बंद केली होती. त्यानंतर सर्व सुरळीत चालू असताना कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार सुरू होता.
अपघातानंतर कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीती आहे. त्यांनी उरण मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी सहकार्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आजपासून उरण मार्गावरील एनएमएमटी बसची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.