Mumbai News: ‘बेस्ट’च्या जुन्या बस भंगारात काढल्याने बेस्ट गाड्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.
त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात आगामी दीड वर्षात २,४०० नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बस दाखल होत आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठी ४ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले.(mumbai public transport News)
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड’ ही कंपनी १२ मीटर आणि ९ मीटरच्या वातानुकूलित बस पुरवणार आहे. या कंपनीच्या ४० इलेक्ट्रिक बस सध्या बेस्टसाठी धावत आहेत. १२ मीटरच्या बसची आसनक्षमता ४४ प्रवाशांची आणि ९ मीटर बसची आसनक्षमता ३४ प्रवासी इतकी आहे.(best e bus )
या सर्व ई-बस वातानुकूलित आहेत. या ई-बस प्रदूषण विरहित, पर्यावरणपूरक, वातानुकूलित व आवाज विरहित आहेत. बसची रंगसंगती सुद्धा आकर्षक आहे. या बस एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे २०० कि.मी. अंतर धावू शकतात. ही बस पूर्ण चार्ज करण्यासाठी सुमारे २ तासांचा वेळ लागत असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बेस्टच्या या ई-बसमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे, फ्रंट आणि रिअर एअर सस्पेन्शन, लक्झरी सीट्स, एसी बस, डिस्क ब्रेक्स आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. बेस्टने मुंबई शहरात मिशन १० हजार इलेक्ट्रिक बसचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.(mumbai best system)
बेस्ट प्रशासनाच्या २४०० बसच्या टेंडर प्रक्रियेसाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक, स्वीच मोबिलीटी, पीएमआय, चार्टर्ड स्पीड, जेबीएम, टाटा मोटर, कॉसीस ई मोबिलीटी, कॉन्टीनेन्टल या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन कंपन्या टेंडर प्रक्रियेत पात्र ठरल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५,१५० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्यांचे टेंडरसुद्धा ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ (ईव्हे ट्रान्स) कंपनीला मिळाले आहे.(mumbai bus)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.