thane local station esakal
मुंबई

Thane-Mulund New Station: ‘श्रीस्थानक’ ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नव्या रेल्वेस्थानकाला हे नाव देण्याची मागणी

खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी मंगळवारी ठाणे स्थानकाला भेट देत प्रवासी सोयी-सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्त्वाच्या मागण्याही केल्या.

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे आणि मुलुंड यांच्यादरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वेस्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव ‘श्रीस्थानक’ हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वेस्थानक असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन या स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे, अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी आज केल्या.

खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी मंगळवारी ठाणे स्थानकाला भेट देत प्रवासी सोयी-सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्त्वाच्या मागण्याही केल्या.

नवीन रेल्वेस्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. ठाणे रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास, कल्याण-वाशी, ठाणे ते वाशीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे- वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त, बिना आरक्षित डबा जोडण्यात यावा, अधिकाधिक मेल-एक्स्प्रेस गाड्यांना जाता-येता ठाणे येथे थांबा द्यावा, तसेच प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व-पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर-दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वछतागृहांसकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमित देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाकडे केल्या.

यावेळी प्रवासी संघटनेचे मिलिंद बल्लाळ तसेच नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, सरचिटणीस विलास साठे, स्थानिक नगरसेवक मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT