Take action against journalists for false crimes, Palghar Superintendent of Police 
मुंबई

Palghar Crime: सराईत सोनसाखळी चोरांना पोलिसांनी केली अटक

गुन्हा कबूल केल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली | The investigating officer informed that the crime has been confessed

सकाळ वृत्तसेवा

Nalasopara Crime: रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला जबरदस्तीने धक्का मारून, दमदाटी करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून फरार होणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीचा भांडाफोड करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.

या टोळीतील तिघांना अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून एक लाख १० हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी भिवंडीमध्ये सात आणि वालीव, विरार परिसरामध्ये दोन असे एकूण नऊ गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

अज्जू ऊर्फ अजगर खान (वय ४३), मिराज अहमद अन्सारी (वय ३३), जमाल अन्सारी (वय ३८) असे अटक केलेल्या संशयित सराईत सोनसाखळी चोरांची नाव असून ते भिवंडीत राहणारे आहेत. २१ फेब्रुवारी रोजी विरार पूर्वेतील मनवेलपाडा सिग्नल परिसरात ६४ वर्षांचे वासुदेव म्हात्रे हे जात असताना एका व्यक्तीने त्यांना जोराचा धक्का मारला.

त्यानंतर त्यांनाच जबरदस्तीने दमदाटी करत, तू धक्का मारूनही सॉरी बोलत नाहीस, असे म्हणत त्यांची कॉलर पकडून धक्काबुकी केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पाठीमागून आलेल्या स्कुटीवर बसून फरार झाला होता. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांच्या आदेशावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी पथकासह घटनास्थळावर भेट देत त्याठिकाणचे सीसीटीव्ही, गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आधारे संशयित आरोपींना भिवंडी येथून अटक केले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT