Mumbai crime News sidhivinayak  sakal
मुंबई

Mumbai News: सिद्धिविनायक मंदिरात बनावट व्हीव्हीआयपी दर्शनाचे रॅकेट; पोलिसांकडून कारवाई

भक्तांच्या तक्रारीनंतर हा घोटाळा उघडकीस झाला. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चांदवेकरला अटक केली. | The scam came to light after complaints from devotees. Dadar police registered a case and arrested Chandvekar in this case.

सकाळ वृत्तसेवा


Mumbai News: सिद्धिविनायक मंदिरातील व्हीव्हीआयपी दर्शन रॅकेटप्रकरणी दादर पोलिसांनी जितेश चांदवेकर नावाच्या ३९ वर्षीय फूल विक्रेत्याला अटक केली आहे. चांदवेकर हा सिद्धिविनायक मंदिरातील व्हीव्हीआयपी दर्शनासाठी भक्तांकडून मोठी रक्कम घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. (Dadar Crime)

जितेश चांदवेकर हा वरळीत वास्तव्यास आहे. भक्तांच्या तक्रारीनंतर हा घोटाळा उघडकीस झाला. त्यानंतर मंदिर ट्रस्टने दादर पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चांदवेकरला अटक केली. तसेच पोलिसांनी आणखी तीन संशयितांची ओळख पटवली असून मंगेश चव्हाण, पृथ्वीपाल राजपूत आणि रतिभान यादव अशी त्यांची नावे आहेत. ते सर्व प्रभादेवीचे रहिवासी आहेत.(mumbai News)

व्हीव्हीआयपी दर्शनासाठी भाविकांकडून दोन ते तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते. त्या बदल्यात दर्शनासाठी मंदिरात जलद प्रवेश देण्यात येत असे. कथित व्हीव्हीआयपी दर्शनासाठी काही भक्तांकडून ऑनलाईन रक्कम पोलिसांनी चांदवेकर यांच्या बँक यूपीआई खात्याचाही तपास केला.(Sidhivinayak Mandir News)

तसेच भक्तांशी केलेले अनेक मोठे व्यवहार शोधून काढले. सध्या पोलिस चांदवेकरच्या पेटीएम खात्याद्वारे पेमेंट करणाऱ्या सर्व भक्तांची पडताळणी करत आहेत. आरोपी चांदवेकर गेल्या २५ वर्षांपासून मंदिराबाहेर दुकान चालवत आहे. दादर पोलिसांकडून चौकशीसाठी इतर तीन आरोपींना नोटीस पाठवली आहे.(Sidhivinayak Mandir Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT