बोईसर (बातमीदार) : जिल्हा परिषदेच्या भीमनगर शाळेची इमारत जीर्ण झाली होती. तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी शाळेच्या इमारतीमध्ये पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांची व शिक्षकांची गैरसोय होत होती. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या नूतन इमारत बांधकामाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण समिती सभापती पंकज कोरे, महेंद्र भोणे, निवृत्त शिक्षक काशिनाथ लोखंडे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख संतोष संखे, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संजय पाटील, प्रमुख शिक्षिका बबिता दिवे, ज्योती संखे, बोईसर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या माधवी भोणे, सदस्य रणजित खरात, ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेची ही इमारत सर्व सुविधांनी सज्ज असेल आणि यात मुले शिक्षण घेऊन समृद्ध होतील, असा विश्वास पंकज कोरे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.