Mumbai Pollution sakal
मुंबई

Navi Mumbai Pollution: तुर्भे येथील केमिकल कंपनीमुळे वायू प्रदूषण; परिसरातील कामगार त्रस्‍त

Navi Mumbai Pollution: कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त आणि असह्य वासामुळे इतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण करणेही अशक्य झाले आह |

CD

Navi Mumbai Pollution: तुर्भे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीमधून घातक रासायनिक उत्सर्जन होत असल्याने या पट्ट्यात असलेल्या इतर कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना त्‍याचा त्रास होत आहे. या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त आणि असह्य वासामुळे इतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण करणेही अशक्य झाले आहे.

त्यामुळे या कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी येथील कामगार वर्गाकडून करण्यात येत आहे. तुर्भे एमआयडीसीतील एका केमिकल्स कंपनीमधून सतत दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुके बाहेर पडत असल्यामुळे परिसरातील संपूर्ण वातावरण प्रदूषित होत आहे. या दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार या भागातील इतर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या केमिकल कंपनीतून जमिनीखाली रसायने सोडण्यात येत असल्यामुळे लागून असलेल्या शेजारील प्लॉटमधील विविध प्रकारची फळझाडे व इतर झाडे मृत झाल्याची माहिती पुलराज इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिली. कंपनीकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडण्यात येत असल्यामुळे, तसेच विषारी धुरामुळे या भागातील नागरिकांमध्ये विविध प्रकारचे आजार पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कंपनीच्या आजूबाजूला विविध टेक्निकल सर्व्हीसेस, फूड्स, फार्मास्युटिकल, इन्फ्रास्ट्रक्चर्स आदी कंपन्या असून त्यात पाचशेपेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. त्याशिवाय या भागात नव्यानेच तारांकित हॉटेलदेखील सुरू झाले आहे. त्‍यामुळे या कंपनीकडून घातक रासायनिक उत्सर्जन थांबवण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नसल्याने कामगार वर्गाकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

या केमिकल्स कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त आणि असह्य वासामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना दुपारचे जेवण करणेही अशक्य झाले आहे. या त्रासाबाबत आम्ही मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार करून त्याबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित कंपनीवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.


- जेम्स डाबरे, ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर, ऑफशोअर इन्फ्रास्ट्रक्चर्स लि.


तुर्भे एमआयडीसीतील संबंधित केमिकल्स कंपनीबाबत यापूर्वी आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना कामकाजात सुधारणा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. सध्या या कंपनीबाबत मंडळाकडे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत. तक्रार आल्यास त्यानुसार कंपनीवर कारवाई करण्यात येईल.


- जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT