मुंबई

Crime News: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाला निखाऱ्यावर नाचवले

याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली | Senior Police Inspector Pramod Babar informed case registered in Murbad Police Station|

सकाळ वृत्तसेवा

Murbad Crime: जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका वृद्धाला आगीच्या जळत्या निखाऱ्यांवर नाचवल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

मुंबईशेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या केरवेळे गावातील ही घटना घडली आहे. यामध्ये ७५ वर्षीय लक्ष्मण भावार्थे हे आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली.

केरवेळे गावात लक्ष्मण भावार्थे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यातच या गावातील काही ग्रामस्थांना लक्ष्मण हे तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य (भुताळ्या) करून जादूटोणा करत असल्याचा संशय होता. त्यातच ४ मार्चला रात्री केरवेळे गावात मंदिरसमोर ग्रामस्थांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

त्या रात्री जागरणाचा गोंधळ सुरू असताना त्याच गावातील १५ ते २० जणांनी लक्ष्मण भावार्थे यांना अंथरुणावरून उचलून गोंधळाच्या ठिकाणी जळत्या निखाऱ्यांवर उभे केले. ‘चल तुझा देव अंगात आणून दाखव, तू भुताटकी करतोस कबूल कर,’ असे म्हणून जबरदस्ती त्यांना पकडून जळत्या निखाऱ्यांवर उभे केले. त्यांना मारहाणही करण्यात आले.

हा सर्व प्रकाराचा व्‍हिडीओ काढून गावातील एका जागरूक नागरिकाने तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे पाठवला. या व्हायरल व्हिडीओमुळेच हा अघोरी प्रकार उघड झाला. पेटत्या निखाऱ्यांवर नाचवल्याने लक्ष्मण हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्या पायाला फोड आले असून पाठीवरची कातडीही जळाली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भुताटकी काढणाऱ्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करा - ‘अंनिस’ची मागणी


गरीब कुटुंबातील वृद्धास भुताळ्या समजून त्याची जळत्या निखाऱ्यावर अग्निपरीक्षा घेणे ही अत्यंत अमानवी घटना आहे. अशी घटना पुरोगामी महाराष्ट्रात आज घडते ही लाजिरवाणी बाब आहे.

लक्ष्मण भावार्थे यांना भुताळ्या ठरवणाऱ्या आसनगावचा देवा म्हसकर (भगत) या मांत्रिकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव, प्रशांत पोतदार, अण्णा कडलास्कर, प्रवीण देशमुख, राहुल थोरात यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT