Mumbai Local: उपनगरीय रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार, १० मार्च २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर, हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरूळ अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदरदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.(mumbai local Megablock)
कुठे : विद्याविहार ते ठाणे, पाचवी-सहावी मार्गिका
कधी : सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या/येणाऱ्या एक्स्प्रेस विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गांवरून चालवण्यात येतील. तसेच नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.(mumbai local megablock news )
कुठे : मानखुर्द ते नेरूळ, अप-डाऊन मार्ग
कधी : सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन लोकल आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी येथे येणाऱ्या अप लोकल सेवा रद्द राहणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.(mumbai megablock update)
कुठे : बोरिवली ते भाईंदर, अप-डाऊन जलद मार्ग
कधी : शनिवार-रविवारी मध्यरात्री ११.३० ते पहाटे ३.३० पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान अप-डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल सेवा विरार-वसई रोड ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.