Navi Mumbai News: ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कळंबोली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन मोरे आणि महेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर अविनाश केसकर, नीलेश घुले आणि इतर शिवसैनिकांनी शिंदेंचा झेंडा हातात घेतला आहे.
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीचे पडघम गेल्या काही दिवसांपासून वाजू लागले आहेत. लवकरच आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यानुसार जोरदार तयारी सुरू झाली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्ष या मतदारसंघांमध्ये मजबूत आहेच.
त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेसुद्धा गेल्या वर्ष दीड वर्षांमध्ये आपली पाळेमुळे रुजवली आहेत. पक्षांमध्ये इन्कमिंग सुरूच असून कळंबोलीमध्ये जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला धक्का दिला आहे. या पक्षाचे कळंबोली उपशहर प्रमुख सचिन मोरे आणि महेंद्र पवार यांनी गुरुवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
याशिवाय उपमहानगर संघटक संजय सावंत, शाखाप्रमुख नीलेश घुले, हनुमंत ताम्हणकर, रवींद्रनाथ राणे, दिनेश शर्मा, अविनाश केसकर, आदिनाथ जायभाय, तसेच उपशाखाप्रमुख साईस मुळीक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर संदेश वाघमारे आणि तुषार चौधरी यांचेही पालकमंत्री व खासदारांनी स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक मंगेश रानवडे, तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, संजय शेडगे, महेश गोडसे, नीलेश डिसले यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना आपल्या पक्षामध्ये सन्मान केला जाईल. त्यांना जबाबदाऱ्यासुद्धा दिल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.