Kalyan Metro News: कल्याण-तळोजा १२ या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कल्याण-शिळ मार्गावरील नवीन पलावा शेजारी असलेल्या भागात या प्रकल्पाचे पहिले पाईल ड्रील यशस्वीपणे करण्यात आले.
आठवड्याभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीच नव्हेतर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील लाखो लोकांना मोठा फायदा होणार आहे.
आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासोबतच लोकांच्या वेळेची आणि इंधनाचीही मोठी बचत होण्यास मदत होईल. या प्रकल्पामध्ये कल्याण ते तळोजा दरम्यान १९ उन्नत स्थानके असणार असून या स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने एक हजार ५२१ कोटींची निविदाही काढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.