मुंबई

रमजाननिमित्त सुकामेवा, रसदार फळांनी बहरला वाशी बाजार

CD

वाशी, ता. १० (वार्ताहर) : मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानची सुरुवात सोमवारपासून (ता. ११) सुरू होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारातील ड्रायफ्रुट आणि फळ मार्केटमध्ये सुकामेवा आणि रसदार फळांची आवक वाढलेली दिसत आहे. ड्रायफ्रुट मार्केटमध्ये अरबस्तानहून आलेल्या विविध प्रकारच्या प्रजातींचे खजूर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत; तर फळ बाजारात अननस, कलिंगड, द्राक्ष, पपई, टरबूज, खरबूज इत्यादी फळांची चलती दिसत आहे.

बाजारातील फळांची आवक आणि दर
फळे आवक दर (प्रतिक्विंटल रु.)
कलिंगड ६,३४० क्विंटल ६००-१,२००
पपई १,९७० क्विंटल १,०००- २,४००
खरबूज १,४९० क्विंटल २,०००- २,५००

---------
खजूरचे प्रकारानुसार दर (प्रतिकिलो रुपयांत)
१,५४१ क्विंटल आवक
कलमी खजूर ६००-७००
किमिया खजूर २५०-३,०००
मेडजुल खजूर १,१००-१,२००
इराणी खजूर ३००-४००

------
सुकामेवा
काजू ३५० क्विंटल ६५,०००-९०,०००
बदाम ५८३ क्विंटल ६०,०००-८५,०००

विविध प्रकारच्या भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज, जर्दाळू, अक्रोड, अंजीर, मनुका इत्यादी सुक्या मेव्यालादेखील ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.

----------
खजुराचे आणि सुक्या मेव्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत; परंतु थेट माल विक्री होत असल्याने बाजारात येऊन माल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी दिसत आहे. रमजानचा महिना असल्याने ग्राहक बाजाराकडे येतील, अशी आशा आम्ही बाळगून आहोत. रमजानसाठी आणि इतर वेळीही उत्तम प्रतीचा सुकामेवा आणि खजूर एपीएमसी ड्रायफ्रुट मार्केटमध्ये मिळेल. त्यामुळे इतर कुठेही जाण्याऐवजी इथे येऊन खरेदी करा.
- शंकर खियानी, सुकामेवा व्यापारी

------
फळ बाजारात फळांची आवक चांगली होत असून रमजानच्या काळात चांगला व्यापार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजूर आणि शेतकरी यांनादेखील चांगला फायदा होईल. फळांच्या किमती स्थिर राहतील, अशी अपेक्षा आहे आणि येत्या काळात आवक वाढण्याची शक्यता आहे.
- इस्त्रार खान, फळ व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT