Mumbai News: नऊ महिन्यांत मुंबईतील ऑटोरिक्षांची संख्या दोन लाख तीस हजारांवरून दोन लाख साठ हजारांवर पोहचली आहे. यामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिक्षांची वाढती संख्या पाहता मुंबईत गर्दी आणि पार्किंग यासारख्या समस्या वाढू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सरकारने स्वयंरोजगार उपक्रम म्हणून खुली परमिट प्रणाली सुरू केली आहे. ज्यामुळे दोन लाख साठ हजार ऑटोरिक्षा चालवण्यासाठी अर्ज करण्याची आणि परमिट मिळवण्याची परवानगी मिळाली. गेल्या नऊ महिन्यांत प्रतिदिवस राज्यात ७६ रिक्षा परमिट देण्यात आले आहेत. २०१७ मध्ये रिक्षाचा परवाना मुक्त करण्यात आल्यानंतर रिक्षाचालकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. यामध्ये अनेक रिक्षा कर्जाने घेतल्या जातात. (Mumbai riksha traffic)
रिक्षा रोजगार उपलब्ध करण्याचा एक स्रोत आहे, पण रिक्षा चालवताना अनेक रिक्षा चालक भाडे नाकारतात. जादा भाडे आकारतात. त्याला लगाम लागायला हवा. रिक्षांबाबत प्रवाशांच्या प्रामुख्याने तीन तक्रारी असतात. यामध्ये भाडे नाकारणे, काही जण अवाच्या सवा भाडे आकारतात किंवा मीटरप्रमाणे न चालणे यासारख्या तक्रारींसाठी ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे; मात्र यामध्ये तक्रार करण्यासाठी प्रवासी पुढे येत नाहीत.
मुंबई महानगर रिक्षा संख्या : ४.५ लाख
पश्चिम उपनगर : १.८ लाख
पूर्व उपनगर : ८० हजार
---
वर्ष : रिक्षा संख्या
२०१० : १.१ लाख
२०१५ : १.३ लाख
२०१७ : २ लाख
२०१९ : २.१
२०२० : २.३
२०२४ : २.६
महाराष्ट्र सरकारने मुक्त रिक्षा परवाना सुरू केला असून मागेल त्यास परमिट असे सरकारचे धोरण आहे. यामुळे लोकसंख्येपेक्षा अधिक रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली असून रिक्षाचालकांना बँकेचे हप्ते भरणेदेखील मुश्कील झाले आहे.
-----
मुक्त रिक्षा परवान्यांमुळे शहरात रिक्षांची संख्या भरमसाट वाढली असून मोठ्या प्रमाणात रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. प्रवाशांपेक्षा अधिक रिक्षा झाल्यामुळे दिवसभर रिक्षाचालकाला भाडे मिळत नसल्यामुळे काही रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
..
परवाने खुले करण्यात आल्यामुळे प्रत्येक शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने शहरात वाहतूककोंडी, प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. परवाने जास्तीत जास्त परप्रांतीयांना देण्यात आल्याने स्थानिक वंचितच राहिले आहेत. मुक्त रिक्षा परवाना धोरणाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.