vande bharat  esakal
मुंबई

Railway News: अहमदाबाद- मुंबई मार्गावर आणखी एक वंदे भारत ट्रेन !

सकाळ वृत्तसेवा

Vande Bharat News| मुंबईला जोडणारी सहावी सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन मुंबई ते अहमदाबाददरम्यान मंगळवारपासून धावणार आहे. या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

सध्या एक वंदे भारत ट्रेन गांधीनगर कॅपिटल-मुंबई सेंट्रलदरम्यान धावत आहे. आता दुसरी वंदे भारत ट्रेनदेखील सुरू होणार आहे. एकाच मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन धावण्याची ही देशातील पहिलीच वेळ असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.(Railway News: Another Vande Bharat train on the Ahmedabad-Mumbai route)

महाराष्ट्रात एकूण सात वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. आता ही संख्या वाढून आठ इतकी होणार आहे. सध्या वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते सोलापूर, बिलासपूर ते नागपूर आणि नागपूर ते भोपाळ या मार्गावर धावत आहे. आता मंगळवारी राज्याला आठवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे.

पश्चिम रेल्वेची तयारी पूर्ण


मुंबई-अहमदाबाददरम्यान वंदे भारत ट्रेनची मागणी वाढली होती. कारण सध्या धावणारी वंदे भारत ट्रेन पूर्ण क्षमतेने धावत होती, हे लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने आता दुसरी वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी केली आहे. शनिवारी दुपारी १६ डब्यांची नवीन वंदे भारत ट्रेन उधना रेल्वे यार्ड पिट लाईनवर आणण्यात आली आहे.

दहा गाड्यांचे उद्‍घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अहमदाबाद येथून अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत ट्रेनसह एकूण ९ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये म्हैसूर-चेन्नई, लखनऊ-डेहराडून, कलबुर्गी-बंगळूर, रांची-वाराणसी, दिल्ली ते खजुराहो, सिकंदराबाद- विशाखापट्टणम, न्यू जलपायगुडी-पटना, पटना-लखनऊ आणि पुरी-विशाखापट्टणम वंदे भारत यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT