Uddhav Thackeray esakal
मुंबई

Uddhav Thackeray: कोस्टल रोडचे श्रेय आमचे ; शिंदे,फडणवीसांचा संबंधच काय?

सकाळ वृत्तसेवा


मुंबई, ता. १० : कोस्टल रोड ही शिवसेनेची संकल्पना असून कोरोनाच्या काळातही आम्ही हे काम नेटाने लावून धरले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही या प्रकल्पाशी संबंधच काय, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील तीन शाखांना आज (ता.१०) त्यांनी भेट दिली. तेव्हा ते बोलत होते.

दिंडोशी या पश्चिम उपनगरातील शिवसेना शाखेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातले उमेदवार अमोल कीर्तिकर, तसेच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू उपस्थित होते. आर्थिक अडचणीतली मुंबई महापालिका आमच्या काळात आर्थिकदृष्‍ट्‍या मजबूत झाली, असे सांगत त्यांनी मुंबईतल्या विकासाचे श्रेय शिवसेनेचे असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातले मतदार आमच्यासमवेत असून महापालिका निवडणुकांना भाजप आणि एकनाथ शिंदे घाबरतात, असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, दोन-दोन वर्षे उलटली तरी निवडणुका घेण्याची त्यांची हिंमत नाही. ‘वन नेशन वन इलेक्शन’प्रमाणे लोकसभा, विधानसभा, महापालिका एकत्र निवडणुका घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT