मुंबई

अर्थ - ऑल-इन-वन डिजिटल बिलिंग सॉफ्टवेअर

CD

लघु उद्योजकांसाठी कॅप्टनबिझचे
ऑल-इन-वन डिजिटल बिलिंग सॉफ्टवेअर
मुंबई, ता. १४ ः कॅप्टनबिझ हे ऑल-इन-वन डिजिटल बिलिंग सॉफ्टवेअर, मुंबई-नागपूर-पुणे यांसारख्या शहरातील लघु उद्योजक आणि किराणा व्यवसायासारख्या अनेक व्यवसायांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे कॅप्टनबिझचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशराज वकील यांनी पत्रकारांना सांगितले. 
कंपनी येत्या काही दिवसांत अनेक छोट्या-मोठ्या शहरांमध्ये आपला विस्तार करणार असल्याचेही ते म्‍हणाले. या सॉफ्टवेअरमुळे एमएसएमईंना त्यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार सुलभतेने करता येतील. त्‍यासाठी या सॉफ्टवेअरमध्ये अनेक वैशिष्ट्ये असल्याचेही ते म्हणाले.
छोट्या व्यावसायिकांना अचूकपणे इनव्हॉईस तयार करणे, जीएसटी नियमांचे व्यवस्थित पालन करणे, या त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील. वापरकर्ते कॅप्टनबिझचा वापर करून ई-इनव्हॉइससाठी नोंदणी करू शकतात. जीएसटीएन वेबसाइटला भेट न देता थेट प्लॅटफॉर्मवर इनव्हॉइस तयार करू शकतात. वापरकर्ता आमचे बिलिंग सॉफ्टवेअर केव्हाही, कुठेही, विविध प्लॅटफॉर्मवर, वेब, मोबाईल आणि स्मार्टवॉच आदींवर वापरू शकतो, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Team: भारतीय संघात 125 कोटी रुपयांचे वितरण कसे होणार? टॅक्समध्ये किती पैसे कापले जाणार? जाणून घ्या

Educational News : तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी! राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे निर्देश

Team India Victory Parade: वानखेडेवर सेलिब्रेशनवेळी हार्दिकच्या हातात फॅनने फेकलेला शर्ट आला अन् मग बुमराह...

Radhakrishna Vikhe Patil : दूधप्रश्‍नाबाबत केंद्र सरकार सकारात्‍मक; अमित शहा यांचे वेधले लक्ष

Maharashtra Live News Updates : घरी झोपलेल्या तरुणांची घरात घुसून निर्घृण हत्या; नाशिकमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT