मुंबई

Mumbai News: कल्याण - डोंबिवलीहून भिवंडी, बदलापूर पर्यंत करता येणार बसप्रवास

या महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर डोंबिवलीचा प्रवासी एकाच बसमधून कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी शहरापर्यंत प्रवास करू शकणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: कल्याण-डोंबिवली पालिकेसह लगतच्या महापालिकांचे कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.

या महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर डोंबिवलीचा प्रवासी एकाच बसमधून कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी शहरापर्यंत प्रवास करू शकणार आहे.

उलट दिशेने भिवंडीकडून डोंबिवलीपर्यंत प्रवास करू शकणार आहे. गेल्या दीड वर्षापासून या महामंडळाच्या स्थापनेचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित होता.

कल्याण महानगर परिवहन महामंडळाचा कारभार सुरू झाल्यानंतर या महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या भिवंडी पालिका, उल्हासनगर पालिका, अंबरनाथ, बदलापूर पालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, महिलांना या सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयुक्त, वाहतूक, परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगर परिषद यांच्या एकत्रित सहभागामधून या क्षेत्राकरिता प्राधिकरण करून सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (केएमपीएमएल) या अभिनामाची कंपनी स्थापन करण्यास शासनाने १४ मार्चला मंजुरी दिली आहे. याच अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)च्या धर्तीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (केएमपीएमएल) स्थापन केली आहे.

गठित संचालक मंडळाची पहिली बैठक १५ मार्चला महापालिका आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या संचालक मंडळात वरील नमूद महानगरपालिका व नगर परिषदांचे महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, आरटीओ, एमएमआरडीएचे प्रतिनिधी, सीआयआरटी पुणेच्या संचालकांचा अंतर्भाव राहील.

कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बसमधून पालिका हद्दीतील ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना केडीएमटीच्या बसमधून शनिवारपासून मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच बैठकीमध्ये महामंडळाचे पुढील नियोजन आणि धोरणात्मक निर्णयाबाबत माहिती देण्यात आली.

कल्याण-डोंबिवली शहरात महापालिकेच्या परिवहन उपक्रमातून ज्येष्ठांना मोफत प्रवासाची तर महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. १५) हा निर्णय घेतला. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT