ST Bus  esakal
मुंबई

Holi News: होळीसाठी एसटीची जय्यत तयारी; १२६ विशेष जादा गाड्यांचे नियोजन

एसटीच्या ठाणे विभागाचे २२ मार्चपासून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन आहे | Thane Division of ST is planning to release excess trains from March 22

सकाळ वृत्तसेवा

ST News: शिमग्याला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदा १२६ विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यात आरक्षणाच्या १०६ तर ग्रुपच्या २० गाड्यांचा समावेश असून यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी एसटीचा चांगला पर्याय आहे.


होळीपाठोपाठ असलेल्या धुळवडीसाठी मुंबईसह उपनगरातील प्रवाशांची तयारी सुरू आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची लगबग लक्षात घेता एसटीच्या ठाणे विभागाचे २२ मार्चपासून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन आहे.

तसेच २३, २४, २५ आणि २६ मार्च रोजी अतिरिक्त गाड्या सोडण्यावर भर आहे. तसेच आठवड्याभरात ठाणे-१ आगारातून २९, ठाणे- २ आगारातून ३९, कल्याण आगारातून २३ आणि विठ्ठलवाडीतून ३१ अशा १२२ गाड्या सोडण्यात येणार आहे.

या गाड्यांसाठीचे तिकीट आरक्षण सुरू असून चाकरमान्यांनी होळी सणाला जाण्यासाठी खिडकी तसेच ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

आगारातून सुटणाऱ्या गाड्या
ठाणे- १ : महाड, पाली, कावळा, पोलादपूर, चिपळूण, मंडणगड, दुर्गेवाडी-मंजूत्री, कासे माखजन, दापोली.( Mahad, Pali, Kavala, Poladpur, Chiplun, Mandangad, Durgewadi-Manjutri, Kase Makhajan, Dapoli)


ठाणे- २ : शिरगाव, फौजी अंबावडे, चिपळूण, शिवथरघळ, बीरमणी, कोतवाल, दापोली, महाड, खापरपा, शिंदी, गुहागर, खेड, देवळी, भेदवाडी.(Shirgaon, Fauji Ambavade, Chiplun, Shivtharghal, Birmani, Kotwal, Dapoli, Mahad, Khaparpa, Shindi, Guhagar, Khed, Devli, Bhedwadi


)


कल्याण : पोलादपूर, कोतवाल, दिवेआगार, फौजी अंबावडे, शिवथरघळ, खेड, चिपळूण, दापोली (Poladpur, Kotwal, Diveagar, Fauji Ambavade, Shivtharghal, Khed, Chiplun, Dapoli)


विठ्ठलवाडी : चिपळूण, तळीये, दापोली, ओंबळी, गुहागर, मुरुड, रत्नागिरी, काजूर्ली, कासे माखजन, गराटेवाडी, दापोली, साखरपा (Chiplun, Taliye, Dapoli, Ombli, Guhagar, Murud, Ratnagiri, Kajurli, Kase Makhjan, Garatewadi, Dapoli, Sakharpa)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT