Mumbai Crime News: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने शनिवारी (ता. १६) आणि रविवारी (ता. १७) केलेल्या नऊ वेगवेगळ्या प्रकरणांसंबंधी कारवायांत १.७१ कोटी रुपयांचे २.७८ किलो सोने आणि विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. (Gold worth crores seized at Mumbai airport)
पहिल्या प्रकरणात, आफ्रिकेच्या आदिस अबाबा येथून प्रवास करणाऱ्या एका परदेशी नागरिकाला विमानतळावर थांबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता प्रवाशाच्या हँडबॅगमध्ये ९८७ ग्रॅम वजनाचे पाच सोन्याचे वितळलेले बार सापडले.
दुसऱ्या प्रकरणात, सिंगापूरहून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाच्या कपड्यांमध्ये ८२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार लपवून ठेवलेले आढळून आले. प्रवाशाला त्वरित अटक करण्यात आली.
तिसऱ्या कारवाईत रविवारी दुबईहून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाला सुरक्षारक्षकांकडून तपासण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्या शरीरावर ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लपवून ठेवलेले आढळले.
याशिवाय एका कारवाईत दुबईहून प्रवास करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना एकत्रितपणे २४२.४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन सोन्याच्या रोडियम प्लेटेड चाव्या, विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या.
आणखी एका महत्त्वपूर्ण कारवाईत रविवारी रियाधहून प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अडवण्यात आले आणि कानात लपवून ठेवलेले २१६ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बार सापडले. अशा एकूण नऊ प्रकरणांत कारवाई करण्यात आली.(Two gold bars weighing 216 grams were found hidden in the ear)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.