खारघर, ता. १९ (बातमीदार) : संकटसमयी अनेक महिला आणि तरुणींना प्रतिकार करता येत नसल्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. कधी कधी यामध्ये अनेक तरुणींचा नाहक बळीही जातो. त्यामुळे त्यांना स्वतःचे रक्षण करता यावे यासाठी खारघर येथील शिव आधार सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने लाठी-काठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर येथील शांतिदूत मर्दानी आखाड्याच्या वतीने लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा कसा चालवावा, याविषयी प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. हे प्रशिक्षण खारघरमधील शिव आधार संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. लाठी-काठी प्रशिक्षणाची आवड असलेल्या महिला, मुली व तरुणींनी संस्थेचे पदाधिकारी सदानंद शिरसकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.