New Delhi : झोमॅटोने नुकतेच आपले ‘शुद्ध शाकाहारी धोरण’ जाहीर केले होते. त्यानुसार शाकाहारी पदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला हिरवा गणवेश परिधान करण्याचा आपला निर्णय झोमॅटोने बुधवारी (ता. २०) अखेर मागे घेतला.(Zomato finally reversed its decision to make delivery boys wear green uniforms)
शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ पोहोचवणारे डिलिव्हरी बॉय लाल गणवेशच परिधान करतील, असे झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दिपींदर गोयल यांनी स्पष्ट केले. झोमॅटोच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली होती. (Delivery boys delivering vegetarian and non-vegetarian food items will wear red uniform only )
शुद्ध शाकाहारी ग्राहकांसाठी विशेष सेवा सुरू केल्याच्या घोषणेनंतर झोमॅटोवर विविध स्तरातून टीका होत होती. शाकाहारी पदार्थ पोहोचवणाऱ्यांसाठी हिरवा तर मांसाहारी पदार्थ पोहोचवणाऱ्यांसाठी लाल गणवेश अशी विभागणी झोमॅटोने केली होती. असे झाले तर लाल गणवेश असणाऱ्या डिलिव्हरी बॉयना अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जाईल, अशी चिंता अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती. तसेच अनेकांनी यावर टीकाही केली होती. याची दखल घेत झोमॅटोने हा निर्णय मागे घेतला. याची माहिती देताना सीईओ गोयल ‘एक्स’वर म्हणाले की, शाकाहारी लोकांसाठी विशेष सेवा पुरवण्याचा आमचा निर्णय आम्ही कायम ठेवत आहोत; परंतु शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ पोहोचवणारे डिलिव्हरी बॉय एकच म्हणजे लाल ड्रेस परिधान करतील.(The delivery boys delivering both the items will wear the same red dress)
Zomatoशाकाहारींसाठी विशेष सेवा म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण देताना गोयल म्हणाले की, दोन्ही पदार्थ पोहोचवणारे डिलिव्हरी बॉय सारखेच गणवेश परिधन करतील; पण झोमॅटो ॲपवर ठळकपणे याचे वेगळेपण दिसेल आणि शाकाहारी ग्राहकांना त्यांची ऑर्डर फक्त शाकाहारी डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातूनच दिली जाईल. तसेच कुणालाही सोसायटीमध्ये अडवले जाणार नाही. आमच्या डिलिव्हरी बॉयची सुरक्षा ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.