Domblivali Crime News: पाळणाघरात बालकांचा सांभाळ करणारे कर्मचारी, सेंटरचालक मुलांना मारहाण व संतापजनक वागणूक देत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या सेंटरमधील व्हिडिओ व पालकांच्या तक्रारीवरून डोंबिवली पोलिस ठाण्यात पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेस राहणारे मंदार उगले व त्यांची पत्नी हे दोघे कामावर जात असल्याने ते त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ठेवतात. या पाळणाघरात गणेश प्रभुणे त्यांची पत्नी आरती प्रभुणे व राधा नखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात.
प्रभुणे दाम्पत्य व राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते. त्याला मारहाण केली जात होती, त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. याचदरम्यान या पाळणाघरात साधना सामंत ही महिलादेखील काम करण्यास गेली.(A woman Sadhana Samant also went to work in this nursery)
तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला. या प्रकारचा सामंत यांनी व्हिडिओ काढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला. कविता यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी गावंड यांच्यासहित रामनगर पोलिस ठाणे गाठले.
याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी तत्काळ तक्रार दाखल करून घेण्याचा सूचना संबंधितांना दिल्या. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.