मुंबई

Loksabha 2024 : निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगण्यास बंदी; शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले

Possession of weapons has been banned during the election period, license holders have been asked to deposit their weapons with the police at the police station in Panvel area of ​​Circle-2 of Navi Mumbai Police Commissionerate.

CD

Panvel News: निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केली असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी विविध बाबींवर निर्बंधांचे आदेश लागू केले आहेत.

निवडणूक कालावधीत शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली असून, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ-२ पनवेल हद्दीतील पोलिस ठाण्यामध्ये परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहे. (panvel News )

आचारसंहिता लागू झाल्याने पोलिस ठाणेनिहाय परवानाधारक शस्त्रधारकांशी संपर्क केला जात आहे. निवडणुका झाल्यानंतर परवानाधारकांना शस्त्रे पुन्हा दिली जातील, असे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतील शस्त्र परवानाधारकांना त्यांची शस्त्रे जवळच्या संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेंतर्गत कार्यरत शस्त्र विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यानुसार शस्त्र परवानाधारकांशी संपर्क साधून त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.(Maharashtra News)

त्यानुसार शस्त्र परवाना घेतलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला जात आहे. नियमानुसार आचारसंहिता लागू झाल्यापासून परवानाधारक शस्त्रधारकांना त्यांच्याकडील शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागात जमा करावी लागणार आहेत. हा आदेश ६ जूनपर्यंत लागू राहणार आहे.

शासकीय परिसरातही प्रतिबंध


निवडणुकीच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्याग्रह करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आदी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT