Anna bhau Sathe  Sakal
मुंबई

Anna Bhau Sathe: अण्णाभाऊ साठे यांच्या २१ पुस्तकांचे भाषांतर पूर्ण

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य प्रकारांतील २१ पुस्तकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतर करून ते ग्रंथ पूर्ण केले आहेत |21 books of Anna Bhau Sathe's literary genres have been translated into English and other languages ​​and those books have been completed

CD

Anna Bhau Sathe: विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राने मागील काही महिन्यांच्या कालावधीत अण्णा भाऊ साठे यांच्या विविध कादंबऱ्या आणि इतर साहित्य प्रकारांतील २१ पुस्तकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतर करून ते ग्रंथ पूर्ण केले आहेत.

या भाषांतरित ग्रंथांचे लवकरच प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती बुधवारी झालेल्या सिनेट बैठकीत देण्यात आली. सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम यांनी कटमोशनच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राला विद्यापीठाच्या मागील अर्थसंकल्पात केवळ २० लाखांची तरतूद केली होती.

आजच्या अर्थसंकल्पात नेमकी किती तरतूद करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करून या अध्यासनाच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती आणि इतर संशोधनासंदर्भात उपक्रम राबविण्याची मागणी करून त्यासाठी किमान एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली होती.

त्यावर प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी या अध्यासनात अनेक चांगले उपक्रम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच यावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी अधिकची माहिती देत या अध्यासनाने सुरू केलेल्या भाषांतरित पुस्तकांच्या उपक्रमाचे सरकारनेही कौतुक केल्याचे सांगितले.

डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, मुंबई विद्यापीठात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राची स्थापना २०२० मध्ये झाली. मागील वर्षी या अध्यासनाला २० लाख रुपयांची तरतूद विद्यापीठाने केली होती. २१ पुस्तकांचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.

यात १५ पुस्तके इंग्रजीत आणि इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहेत; तर ‘फकिरा’ या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करून ती जगभर पोहोचविण्याचे कार्य आपणच केले असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT