मुंबई

Thane News: भिवंडीत ऐन रमजान महिन्यात पाणीटंचाई

ऐन रमजान महिन्यात शहरातील कुरेशीनगर निजामपूर या भागात गेल्या काही दिवसांपासून पाणीकपात सुरू आहे | During the month of Ain Ramzan, water shortage has been going on for the last few days in Qureshinagar Nizampur area of ​​the city

सकाळ वृत्तसेवा

Bhiwandi News: भिवंडी शहरात अनेक ठिकाणी अशुद्ध आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. तसेच ऐन रमजान महिन्यात शहरातील कुरेशीनगर निजामपूर या भागात गेल्या काही दिवसांपासून पाणीकपात सुरू आहे.(Water Scarcity In Bhiwandi)

याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बुधवारी (ता. २७) धरणे आंदोलन केले.(ramzan in bhiwandi)

भिवंडीत अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात; तर काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शहरातील निजामपूर भागात कुरेशीनगर येथे नियमित पाणीपुरवठा न झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे; तर एका इमारतीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे.

याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी लाल बावटा असंघटित कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. या वेळी महिलांनी सोबत आणलेले रिकामे हांडे वाजवीत पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात रमजानचा रोजा (उपवास) धरलेले महिला-पुरुष सहभागी झाले होते. या वेळी शिष्टमंडळाने आयुक्त अजय वैद्य यांना लेखी निवेदन दिले. अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, असे आंदोलकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT