Mumbai News: मरोळ-मरोशी मार्गावरील मेट्रो तीन प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.(Marol-Maroshi road Closed)
या अंतर्गत मरोळ नाका स्टेशनच्या अंतर्गत कामासाठी मरोळ फायरब्रिगेड कंपाऊंडमधील जागेतील मरोळ नाक्यापासून लोकभारती जंक्शनकडे जाणारा रस्ता, तसेच आश्विन हॉटेलपासून मरोळ नाक्याकडे जाणारा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहणार आहे; तर अंधेरी कुर्ला रोडपासून मकवाना रोडवरही वाहनांच्या वाहतुकीवर प्रवेश बंदी आहे.
अंधेरी कुर्ला रोडवरून मरोळ नाक्यापासून (पूर्वी सुरू असलेला रस्ता क्रमांक ‘ब’) लोकभारती जंक्शनकडे मरोळ मरोशी रोडने जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी एक दिशा मार्ग असेल.
मरोळ मरोशी रोडवरून मरोळ नाक्याकडे जाणारी वाहतूक ही लोकभारती जंक्शनकडून लोकभारती रोडने उजवे वळण घेऊन मकवाना रोडवरून अंधेरी कुर्ला रोडकडे जाईल. अंधेरीकडे जाणारी वाहनांची वाहतूक ‘मेट्रो वन’ पिलर क्रमांक २८१ आणि २८० दरम्यान उजवीकडे वळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.