mumbai local crime sakal
मुंबई

Mumbai Local: गुड फ्रायडेला लोकल घावल्या रविवारच्या वेळापत्राने; प्रवाशांची तारांबळ

कोणतीही पूर्वसूचना न देता लोकल रद्द केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला डब्यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले |The cancellation of the local without any prior notice caused intense displeasure to the passengers. The passengers in the women's compartment were in dire straits

सकाळ वृत्तसेवा

Dombivli News: ‘गुड फ्रायडे’निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवल्या. मात्र, अनेक खासगी कार्यालये सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू असतात. वर्षअखेर असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यामुळे शुक्रवारी सुटी असली तरी रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होती. त्यात डोंबिवली, कल्याण लोकल रद्द झाल्याने नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता लोकल रद्द केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला डब्यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले.(mumbai Local News)

डोंबिवली रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक दोनवर नागरिकांनी कार्यालय गाठण्यासाठी सकाळी ८.१४, ८.४१ वाजता नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. मात्र, या दोन्ही लोकल रद्द करण्यात आल्याची उद्‌घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. या गाड्या रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक बिघडले. रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली.(marathi News)

सरकारी सुटी असली तरी खासगी क्षेत्रात काम करणारा नोकरदार वर्ग सर्वाधिक संख्येने आहे. त्यांना वेळेचेही बंधन असते. त्यामुळे रेल्वेने अगोदरच ही माहिती दिली असती तर तसे नियोजन करून प्रवास केला असता. फलाट क्रमांक दोनवर थांबलोच नसतो. आमचा दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ तेथे न थांबता आम्ही इतर लोकलने प्रवास केला असता, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या.(mumbai Megablock)

अशाच पद्धतीने कल्याणला जाणारी सकाळची ८.२७ ची लोकल रेल्वेने रद्द केली. सकाळच्या तीन लोकल पाठोपाठ रद्द केल्याने प्रवाशांमध्ये संताप झाला होता. अगोदरच उकाड्याने हैराण झालेले प्रवासी लोकल रद्द झाल्याने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने संतप्त झाले होते. महिला प्रवासी या सगळ्या प्रकाराविषयी, रेल्वे प्रशासनाच्या या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत होत्या.

अलीकडे खासगी क्षेत्रात काम करणारा वर्ग सर्वाधिक मोठा आहे. त्यामुळे सरकारी सुटी असली तरी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग कामासाठी घराबाहेर पडतो. याचे भान रेल्वे प्रशासनाने ठेवावे आणि सार्वजनिक सुटीचा विचार करून धडाधड लोकल रद्द करू नयेत.
- लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघ(raiway News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT