मुंबई

सेंट्रल पार्कच्या राखीव जागेवर अतिक्रमण

CD

सेंट्रल पार्कच्या राखीव जागेवर अतिक्रमण
अनधिकृत झोपड्यांसह भंगाराची दुकाने
खारघर, ता. २ (बातमीदार) : सिडको सेंट्रल पार्कच्या राखीव जागेत भंगारमाफियांनी वृक्षतोड करून दुकाने थाटली आहेत; तर अनधिकृत झोपड्या उभारून वास्तव्य करण्यात येत आहे. मात्र सिडकोकडून कोणत्‍याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्‍याने नागरिकांकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
सिडकोने खारघर शहर विकसित करताना सेक्टर २३, २४ आणि २५ मधील शंभर एकर जागेवर सेंट्रल पार्क विकसित करण्याचे नियोजन केले. पहिल्या टप्प्यात ॲम्पिथिएटर, योगा पार्क आणि चिल्ड्रन पार्क उभारले आहे; तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क, चिल्ड्रन पार्क, म्युझिकल फाऊंटेन, व्हर्च्युअल रियॅलिटी गेम्स आदी मनोरंजन सुविधा विकसित करण्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रत्यक्षात नियोजित जागेवर अद्याप कोणतीही वास्‍तू उभारण्यात आलेली नाही. शिवाय सदर जागेवर सिडकोने नवी मुंबई विमानतळ विकसित करताना काही मोठी झाडे पुनर्रोपण केली आहेत. तसेच रोपलागवड केली आहे; मात्र या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून डेब्रिज टाकले जात आहे. सिडकोकडून डेब्रिजमाफियांकडे दुर्लक्ष केले जात आहेत. ही संधी साधून भंगारमाफियांनी सेंट्रल पार्कच्या जागेवर भंगाराची दुकाने थाटली आहेत; तर काहींनी झोपड्या उभारल्‍या आहेत. मात्र सिडकोकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याविषयी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सदर जागा सिडकोची असून सिडकोने कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
....................
सेंट्रल पार्क आणि सेक्टर सात हरित पट्ट्यात सुरू असलेल्या भंगाराच्या दुकानांची पाहणी करून कारवाई केली जाईल.
- संजय जाधव, मुख्य नियंत्रक अधिकारी, अनधिकृत बांधकाम विभाग, सिडको
.............................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT