अंधेरी : कामानिमित्त घरी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अरविंद हुल्हासमल कासलीवाल ऊर्फ अरविंद जैन या ६६ वर्षांच्या हिरे व्यापाऱ्याला आंबोली पोलिसांनी अटक केली. अरविंदने शीतपेयात गुंगीचे औषध टाकून महिलेला दिले आणि तिच्यावर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडीओ बनविले होते.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. ४० वर्षांची ही पीडित महिला मालाडला राहत असून अंधेरीतील एका ज्वेलरी कंपनीत कामाला आहे. कामानिमित्त तिला ग्राहकांकडे जावे लागत होते. तिच्या कंपनीचा अरविंद जैन हा ग्राहक असून गेल्या वर्षी मे महिन्यात ती त्याच्या अंधेरीतील घरी गेली होती.
शुद्धीवर आल्यानंतर त्याने तिला त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडीओ दाखवून या प्रकाराबद्दल कुणाला सांगितल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार प्रकार नंतर तिने मावस बहिणीला सांगितला होता. त्यांनी आंबोली पोलिसांना ही माहिती सांगून अरविंद जैनविरुद्ध तक्रार केली होती. गेल्याच आठवड्यात अरविंद जैनला विक्रीसाठी घेतलेल्या ६३ लाख रुपयांच्या हिऱ्यांचा अपहार करून एका हिरे व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अटक केली होती. तो गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.