मुंबई

व्हीआयपी नंबरसाठी वाट्टेल ती किंमत

CD

वाशी, ता. ४ (बातमीदार) : गर्दीत प्रवास न करता तसेच वेळेत इच्छितस्थळी लवकर पोहोचण्यासाठी स्वतःचे वाहने असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. दुचाकी ही सामान्य बाब झाल्यामुळे चारचाकी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यातच वाहन घेतल्यांनतर प्रतिष्ठेचा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी काही जण वाट्टेल ती किंमत मोजत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पाच हजार ८३१ वाहनांनी व्हीआयपी नंबर घेतला असून त्यामधून सहा कोटी १० लाख ११ हजारांचा महसूल आरटीओच्या तिजोरीत जमा झाला आहे. मार्च २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सहा हजार २९१ वाहनचालकांनी प्रतिष्ठित नंबर घेतले असून यातून आरटीओला सहा कोटी ४० लाख ३१ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीच्या तुलनेत मार्च २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ४६० अधिक वाहनमालकांनी व्हीआयपी नंबर घेतला आहे. त्यामुळे प्रादेशिक कार्यालयाच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसून येत आहे.
व्हीआयपी नंबरसाठी सरकारकडून जादा शुल्क आकारणी केली जात असली तरी नवी मुंबईत व्हीआयपी नंबर घेण्याकडे वाहनचालकाचा जास्त कल दिसून येत आहे. व्हीआयपी नंबर घेताना अंकाची बेरीज करून शेवटाच्या अंकाची संख्या शुभ नंबर असतो, तीच संख्या यायला पाहिजे, असा व्हीआयपी नंबर घेणाऱ्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे आधीचे वाहन लकी लागल्यास त्याच वाहनाचा असलेला नंबर पुन्हा घेण्यासाठीदेखील आरटीओकडे मागणी करण्यात येते.

----------
कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसांची तारीख येणारा वाहनांचा नंबर असावा, अशी काही वाहनधारकांची इच्छा असते. हौसेला मोल नसते या अनुषंगाने प्रतिष्ठित नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढत आहे.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी


-----
आरटीओचे विशेष नंबरासाठीचे दर
व्हीआयपी नंबर चारचाकी किंमत दुचाकी किंमत
१ ४,००,००० ५०,०००
९, ९९, ७८६, ९९९, ९९९९ १,५०,००० २०,०००
२, ३, ४, ५, ६, ७, ८, १०, ११, ५०,००० १०,०००
२२, ३३, ४४, ५५, ६६, ७७, ८८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT